घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानात घातपाताची मालिका कायम; काबूलमध्ये शाळेत बॉम्बस्फोट, 53 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात घातपाताची मालिका कायम; काबूलमध्ये शाळेत बॉम्बस्फोट, 53 जणांचा मृत्यू

Subscribe

अफगाणिस्तानात बॉम्ब स्फोटाची मालिका अद्याप सुरूच आहे. मागील काही दिवसांत झालेल्या बॉम्ब स्फोटात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच पुन्हा एकदा बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

अफगाणिस्तानात बॉम्ब स्फोटाची मालिका अद्याप सुरूच आहे. मागील काही दिवसांत झालेल्या बॉम्ब स्फोटात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच पुन्हा एकदा बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. काबुलमधील शाहिद माजरी रोडवर असलेल्या एका शाळेत आत्मघाती बॉम्ब स्फोट झाला. (Afhganistan Bomb Spot 46 girls women among 53 killed in Kabul education centre)

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील काबुलमधील शाहिद माजरी रोडवर बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 46 मुली व महिलांचा समावेश आहे. या स्फोटामुळे परिसरात दहशतीची वातावरण आहे. शहीद मजारी परिसरात हजारा समाजाचे लोक राहतात. तेथेच हा स्फोट झाला आहे.

- Advertisement -

लिबानच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या स्फोटाबाबत कोणतेही अधिकृत माहितीदिलेली नाही. गेल्याच महिन्यात काबूलमध्येच एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 40 जण जखमी झाले होते. खैर खाना परिसरातील मशिदीत लोक नमाज पठण करत असताना स्फोट झाला होता.

दरम्यान, अफगाणिस्तान बॉम्ब स्फोटाच्या घटनेने हादरला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काबुल शहरातील शाळेत आत्मघाती बॉम्ब स्फोट झाला आहे. हा स्फोट अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शैक्षणिक संस्थेत झाला आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, या आत्मघाती हल्ल्यात 19 लोक ठार झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, या हल्ल्यात 53 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मृतांमध्ये 46 मुलींचा समावेश आहे. या बरोबरच सुमारे 110 लोक जखमी झाले आहेत.


हेही वाचा – ‘5 जी’ आले, पण अर्थकारण बिघडले; शिवसेनेचे ‘सामना’तून मोदी सरकारवर शरसंधान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -