घरदेश-विदेशदिलासा! Air India कडून हवाई प्रवाशांसाठी सवलत; तिकीट दर ५० टक्क्यांवर

दिलासा! Air India कडून हवाई प्रवाशांसाठी सवलत; तिकीट दर ५० टक्क्यांवर

Subscribe

विमान प्रवास अधिक सोपा आणि स्वस्त करत एअर इंडिया या कंपनीकडून प्रवाशांना खास सवलत

गेल्या कित्येक महिन्यापासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. दरम्यान कोरोना काळात सर्वच वाहतुक सेवांवर परिणाम झाला होता. यामध्ये रेल्वे सेवेप्रमाणेच हवाई सेवेवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही कंपन्यांनी आपली विमान सेवा काही ठराविक काळासाठी ठप्प केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक हवाई प्रवाशांनी प्रवास करणं टाळलं. कोरोनादरम्यान विमान प्रवासाचे दरही प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे होते. मात्र अशा परिस्थितीत विमान प्रवास अधिक सोपा आणि स्वस्त करत एअर इंडिया या कंपनीकडून प्रवाशांना खास सवलत देण्यात येत आहे.

एअर इंडियाकडून देण्यात येणारी ही सेवा ठराविक वर्गातील प्रवाशांसाठी आहे. ज्यामध्ये प्रवास भाडं हे अर्ध्यावर आणण्याचा निर्णय Air India कडून घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षांहून जास्त वय असणाऱ्या प्रवाशांसाठी सदर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीनं तिकीट दरांवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना आता एअर इंडिया अर्ध्या दरात तिकीट उपलब्ध करुन देणार येणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. परंतू, प्रवाशांना या सवलतीचा फायदा घेण्यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करणं मात्र बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

या नियमांसह अटींचे पालन करणं बंधनकारक…

  • फ्लाईटच्या वेळेपूर्वी तीन दिवसांआधी तिकीट काढलेले असावे.
  • प्रवासी भारतीय नागरिक असणं आवश्यक असून त्याचे वय ६० वर्षांहून अधिक असावं
  • प्रवाशांकडे वैध ओळखपत्र असणं गरजेचं
  • इकोनॉमी केबिन बुकींग श्रेणीअंतर्गत मूळ तिकीट दराच्या ५० टक्के रक्कम बंधनकारक
  • भारतात कोणत्याही क्षेत्रात प्रवास करण्यासाठी ही सवलत लागू असेल

मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेली सध्याच्या घडीला अशी विमान सेवा पुरवणारी एअर इंडिया ही एकमेव कंपनी आहे. एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांहूनही जास्त किंमतीचं कर्ज असून या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीही विकली जात आहे. तोट्यात असणाऱ्या या कंपनीच्या दृष्टीनं आता तिचं पूर्णपणे खासगीकरण करण्यासाठी केंद्राकडून निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीदेखील मिळतेय.


शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -