घरताज्या घडामोडीकेरळ अपघातात कोरोनाची एंट्री, मृत प्रवाशांमध्ये दोन जण निघाले पॉझिटिव्ह!

केरळ अपघातात कोरोनाची एंट्री, मृत प्रवाशांमध्ये दोन जण निघाले पॉझिटिव्ह!

Subscribe

केरळमधील कोझिकेड विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा भीषण अपघात शुक्रवार संध्याकाळी झाला. या अपघातामध्ये दोन वैमानिकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या १८ प्रवाशांपैकी दोन जणांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टिव्हाने दिलं आहे. सध्या विमान अपघाताबाब चौकशी सुरू आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पी विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान परिस्थितीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया एक्स्प्रेसचे AXB1344, बोईंग ७३७ विमान दुबईहून कोझिकोड येथे वंदे भारत मिशन अंतर्गत येत होते. दरम्यान शुक्रवारी केरळमध्ये मुसळधार पाऊस होता. या विमानात कोझिकोड येथे दुबईहून येणार १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते. हे विमान लँडिंग करताना घसरले आणि भिंतीला धडकून दरीत कोसळले. या भीषण अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. यामध्ये २ वैमानिकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २२ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आणखीच चिंतेत भर पडली आहे. यामुळे विमान अपघातानंतर मदत कार्यात असलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Air India Crash Live Update: नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदिप सिंह पुरी यांना घटनास्थळाची…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -