घरताज्या घडामोडीAmazon : इटलीत ॲमेझॉनला ठोठावला ९,७५० कोटींचा दंड ; 'हे' आहे कारण...

Amazon : इटलीत ॲमेझॉनला ठोठावला ९,७५० कोटींचा दंड ; ‘हे’ आहे कारण…

Subscribe

ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनवर इटलीमध्ये ९,७५० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ॲमेझॉन कंपनीवर लहान विक्रेत्यांवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर दडपशाही केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. इतर कंपन्याना दडपण्यासाठी ॲमेझॉन कंपनी युरोपमधील बाजारपेठेतील वर्चस्वाचा गैरवापर करत असल्यामुळे इटलीच्या अँटिट्रस्ट रेग्युलेटरी ऑथॉरिटीने हा दंड ठोठावला आहे. इटलीमध्ये अथॉरिटीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची कायदेशीर व्यवस्था आहे. दंडाची रक्कम वाढवायची की कमी करायची हे न्यायालय ठरवू शकते.ॲमेझॉनने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

इटलीमधील अँटिट्रस्ट रेग्युलेटरी ऑथॉरिटीने गुरुवारी सांगितले की,ॲमेझॉनने छोट्या प्रतिस्पर्ध्यांना दडपण्यासाठी थर्ड पार्टी सेलर्सचा वापर केला. प्रतिस्पर्ध्यांच्या उत्पादनांच्या विक्री आणि वितरणावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉजिस्टिक सेवा आणि वितरण प्रणाली वापरण्याची परवानगी दिली. इटलीत ही ॲथॉरिटी कुठल्याही कंपनीवर त्याच्या एकूण महसुलाच्या १० टक्क्यांपर्यंत दंड ठोठावू शकते.

- Advertisement -

दोन आठवड्यांपूर्वी, अमेझॉनला युरोपियन कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल ६८.७ दशलक्ष युरोचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळेसचा हा दंडही याच अथॉरिटीने ठोठावला होता. अमेझॉनला यापुढे पारदर्शक कारभार ठेवण्याची सक्त ताकीद देण्याच आली आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक नियंत्रकदेखील नेमण्यात येणार आहे.


हे ही वाचा – ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांची ऑफर अन् कारवाईचा अलर्टही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -