घरदेश-विदेशइराण-अमेरिकेतील तणावाचा भारताला मोठा फटका

इराण-अमेरिकेतील तणावाचा भारताला मोठा फटका

Subscribe

या दोन देशांतील वाद कधी मिटणार? याकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे.

इराणने अमेरिकेची ड्रोन पाडल्याने अमेरिका आणि इराण यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे युनाईटेड एअरलाइन्सने मुंबई ते न्यूयार्क या दरम्यान उडणारी विमान सेवा तात्पुरती रद्द केली आहे. मुंबईहून अमेरिकेला जाणारे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात असल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे विमानाला धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु अमेरीका आणि इराण यांच्यातील वादाने भारताला मोठे नुकसान होत आहे. या प्रकरणात भारताचे पंतप्रधान काय भुमिका घेतात? यावर सर्व भारतीयांचे लक्ष वेधले गेले आहे.

इराणच्या सशस्त्र दलाने गुरुवारी जलसंधी येथील हवाई क्षेत्रात येणाऱ्या अमेरिकेच्या ड्रोनला पाडले होते. या शक्तिशाली ड्रोनची किंमत जवळपास १२६० कोटी रुपये होती. अमेरिका एअरलाइन्सने सांगितले की, इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर त्यांच्यातील वाद सुरुच आहे. एवढेच नव्हे तर, अमेरिकेचे अध्यक्ष यांनी इराणला धडा शिकवणार असल्याचे ट्वीट केले. इराणने सर्वात मोठी चूक केल्याची ट्रम्प म्हणाले आहेत. जर अशा परिस्थितीत अमेरिकेला इराणच्या हवाई क्षेत्रातून विमान घेवून जाणे धोकादायक ठरु शकतो. यामुळे अमेरिकेतून भारताकडे येणारी विमान सेवा अनिश्चिच काळासाठी रद्द करण्यात आली आहे. याचा फटका न्युयार्कमार्गे अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशाला बसणार आहे. न्युयार्कमार्गे अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत विचार सुरु असल्याचे युनायटेड एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

इराण आर्मीच्या कमांडरने सांगितले की, संबंधित अमेरिकेचे ड्रोनने इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्याने ही कारवाई केली आहे. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. तेल उत्पादक व निर्यातदार देशांकडून (ओपेक) तेल पुरवठ्यातील कपात सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे. त्याचाही तेलाच्या दरांवर परिणाम झाला आहे. यामुळे भारताचे पंतप्रधान काय तोडगा काढतात? येत्या काही दिवसात कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -