घरट्रेंडिंगअमित शाहा आणि योगी आदित्यनाथांची गंगेत डुबकी!

अमित शाहा आणि योगी आदित्यनाथांची गंगेत डुबकी!

Subscribe

गंगा घाटावर हजेरी लावल्यानंतर शाहा आण योगी पिठाधीश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या शिबीरासाठी रवाना झाले.

सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आज (बुधवारी) भाजपचे अध्यक्ष अमित शाहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री केशन मौर्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर महेंद्र नाथ पांडे हेदेखील उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या स्थानावर पोहचताच अमित शाह यांनी सर्वप्रथम साधूंसमवेत गंगा नदीत शाही स्नान केले. त्यानंतर शाहा यांनी अक्षयवट, सरस्वती कूप आणि बड्या हनुमान मंदिराचे दर्शन घेतले. दरम्यान, सूत्रांनुसार हा अमित शाहा यांचा खासगी दौरा असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शाही स्नानाच्यावेळी योगी आणि शाहा यांनी गंगेची आरती केली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी, महामंत्री हरि गिरि, योग गुरु रामदेवबाबा यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

गंगा घाटावर हजेरी लावल्यानंतर शाहा आण योगी पिठाधीश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या शिबीरासाठी रवाना झाले. याचठिकाणी त्यांनी साधू-संतांसोबत दुपारचे जेवणही केले. आज संपूर्ण दिवसात शाहा आणि योगी यांचे अनेक कार्यक्रम आखलेले आहेत. याअंतर्गत शाहा सर्व आखाड्यांना भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शाहा अयोध्या राम मंदिराच्या  मुद्द्यावर साधू-संतांशी चर्चा करणार असल्याचंही सूत्रांकडून समजत आहे.

दुसरीकडे, अमित शाहा यांच्या कुंभनगरीतील आगमनावर सपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखिलेश यादव यांना कुंभभूमीत येण्यापासून रोखण्यात आलं होतं. याविरोधात निषेध दर्शविण्यासाठी सापाच्या कार्यकर्त्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी शाहांच्या दौऱ्याला विरोध केला. याप्रकरणी सपाचे पूर्व राज्यमंत्री संदीप सिंग चौहान, राजेश यादव, दीपक शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -