घरदेश-विदेशअमृतसर बॉम्बस्फोट : हल्ल्यात वापरलेला बॉम्ब पाकिस्तानी लष्कराचा

अमृतसर बॉम्बस्फोट : हल्ल्यात वापरलेला बॉम्ब पाकिस्तानी लष्कराचा

Subscribe

अमृतसर बॉम्ब हल्ल्यासाठी HE- 36 सिरीज ग्रेनेडचा वापर केला गेला होता. या प्रकारचे HE- 36 ग्रेनेड पाकिस्तानी लष्करात वापरले जाते. हे एक हॅण्ड ग्रेनेड असून ते आधी धूर सोडते त्यानंतर त्याचा स्फोट होता.

पंजाबच्या अमृतसहमधील निरंकारी भवनावर रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटाची महत्तवाची माहिती तपासातून उघड झाली आहे. बॉम्बस्फोटानंतर पंजाब पोलिसांनी संशयित आरोपींचे स्केच जारी केले आहेत. पंजाब पोलिसांनी हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फूटेज देखील जारी केले आहेत. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली पल्सर बाईकची ओळख करण्यात आली आहे. मात्र या बाईकवर नंबर प्टेल नव्हती. या हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे. हल्ल्यासाठी HE- 36 सिरीज ग्रेनेडचा वापर केला गेला होता. या प्रकारचे HE- 36 ग्रेनेड पाकिस्तानी लष्करात वापरले जाते. हे एक हॅण्ड ग्रेनेड असून ते आधी धूर सोडते त्यानंतर त्याचा स्फोट होता.

माहिती देणाऱ्याला ५० लाख रुपये बक्षीस

याआधी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी संशयितांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस म्हणून ५० लाख रुपयांची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, अद्याप अशा प्रकारची काहीच माहिती पंजाब पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांक १८१ वर आलेली नाही. सूचना देणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

रविवारी बाईकवरुन आलेल्या दोन लोकांनी अमृतसहमधील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला केला. या स्फोटामध्ये एका उपदेशकसह तीन जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. अमृतसरच्या अदलिवाला गावातील निरंकारी भवनामध्ये निरंकारी पंथाचे धार्मिक समागम सुरु होते. त्या दरम्यानच हा स्फोट झाला. बाईकवरुन आलेल्या दोन्ही संशयितांचे चेहरे झाकलेले होते. ग्रेनेट फेकून ते घटनास्थळावरुन फरार झाले होते. दरम्यान, एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

६ ते ७ दहशतवादी पंजाबमध्ये घुसले

जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे ६ ते ७ आतंकवादी दिल्लीत असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. यानंतर पंजाब पोलिसांनी हाय अलर्ट घोषीत केला आहे. याबद्दल पंजाब पोलिसांच्या आयुक्तांना पत्र लिहीण्यात आले होते. हे दहशतवादी फिरोजपूर, गुरुदासपूर, पठानकोट, अमृतसर या भागामध्ये लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील एसएसपी, पोलीस अधिकारी, कमिशनर यांच्यासह बीएसएफला अलर्ट देण्यात आला आहे. सगळ्या शहरांमध्ये नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या – 

पंजाब मधील निरंकारी बाबांच्या आश्रमावर बॉम्बहल्ला; ३ ठार, अनेक जखमी

पंजाबमध्ये ४ दहशतवादी घुसले; जम्मूपासून पंजाबपर्यंत हाय अलर्ट

मोस्ट वॉण्टेड दहशतवादी पंजाबमध्ये; फोटो जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -