घरअर्थजगतLIC IPO Good News: PMJJBY योजनेचे विमाधारक LIC IPO मध्ये सूट मिळण्यास...

LIC IPO Good News: PMJJBY योजनेचे विमाधारक LIC IPO मध्ये सूट मिळण्यास पात्र, LICच्या अध्यक्षांचा खुलासा

Subscribe

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनाच्या (PMJJBY) विमाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये (LIC IPO) PMJJBY विमाधारकांना मोठा फायदा होणार आहे. एलआयसीचे अध्यक्ष एम आर कुमार यांनी माध्यमांशी बातचित करताना सांगितले की, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनाच्या विमानाधारक त्यांच्या आयपीओमध्ये सूट मिळण्यास पात्र असतील. तसेच PMJJBY धारकांना आयपीओमध्ये आरक्षण असेल.

२०१५ साली PMJJBY झाली होती सुरुवात

PMJJBYची सुरुवात २०१५ साली झाली होती. या योजनेअंतर्गत १८ ते ५० वयोगटातील सर्व बँक बचत खातेधारकांना दोन लाख रुपयांचा जीवन विमाची ऑफर केली जाते. यासाठी वार्षिक प्रीमियम रक्कम ३३० रुपये आहे. एलआयसीच्या माध्यमातून ही सरकारी योजना जारी केली जाते. गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार एलआयसी पात्र विमाधारकांना इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial public offering)मध्ये आरक्षण दिले आहे. या अंतर्गत प्रति व्यक्ती कमाल बोली रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल.

- Advertisement -

पॉलिसीधारकांची चांदी होणार

डीआरएचपी म्हणाले की, ज्या लोकांकडे बोली खुली होण्याच्या तारखेपर्यंत एलआयसीची एक किंवा त्यापेक्षा जास्त पॉलिसी आहे आणि जे भारतीय आहेत, ते पॉलिसीधारक आरक्षण अंतर्गत अर्ज करू शकतात. अशा प्रकारे दिले जाणारे आरक्षण एकूण ऑफर आकारांच्या १० टक्क्यांहून जास्त नसणार. दरम्यान सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ लवकरच येण्याचा रस्त्या मोकळ झाला आहे. रविवार संध्याकाळी सरकारने सेबीला एलआयसी आयपीओचा ड्राफ सुपूर्द केला. ड्राफनुसार, एलआयसीचे एकूण ६३२ शेअर असणार आहेत. यामध्ये जवळपास ३१.६ कोटी शेअर्सची आयपीओमध्ये विक्री केली जाईल. हा IPO सरकारसाठी निर्गुंतवणुकीमुळे खूप खास आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे हा आयपीओ ३१ मार्चच्या अगोदर येण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.


हेही वाचा – Share Market : रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स ८८५ तर निफ्टी २५५ अंकांनी घसरला


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -