घरताज्या घडामोडीGoa Assembly Elections 2022: आपच्या तिकिटावर निवडणूक लढा, केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना खुली...

Goa Assembly Elections 2022: आपच्या तिकिटावर निवडणूक लढा, केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना खुली ऑफर

Subscribe

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी खुली ऑफर दिली आहे. उत्पल पर्रिकरांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि निवडणूक लढवावी, अशी खुली ऑफर केजरीवलांनी पर्रिकरांनी दिली आहे.

केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना खुली ऑफर

भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदार संघातून तिकीट देण्यास नकार दिला आहे. त्यांच्याजागी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनोहर पर्रिकर यांनी संपूर्ण आयुष्य भाजप पक्षासाठी वेचूनही त्यांच्या मुलाला पणजी मतदार संघातून तिकीट देण्यास नकार दिला आहे. भाजपने पर्रिकर यांच्याबाबतही यूज अँड थ्रो धोरणच राबवलेलं दिसत आहे. पर्रिकर हे आमच्यासाठी आदर्श नेते होते, असं केजरीवाल म्हणाले. उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून निवडणूक लढवावी आणि आम आदमी पक्ष त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. अशी खुली ऑफर केजरीवालांनी दिली आहे.

- Advertisement -

शिवसेनेनंही त्यांना दिली होती ऑफर

दरम्यान, केजरीवाल यांच्या ऑफर देण्यापूर्वी आणि यादी जाहीर करण्यापूर्वी शिवसेनेनंही त्यांना ऑफर दिली होती. उत्पल पर्रिकर जर पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राहिले तर शिवसेना आणि मित्रपक्ष त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. तसेच ते आपले उमेदवार मागे घेतील, अशी घोषणा देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती.

- Advertisement -

गोव्यात विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार असून निकाल १० मार्चला घोषित केला जाणार आहे. गोव्यात ४० विधानसभा जागा आहेत. ज्यामध्ये भाजपने आज ३४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.


हेही वाचा : Goa Election 2022: उत्पल पर्रिकरांचे तिकिट भाजपने कापले, गोव्यातील ३४ उमेदवारांची यादी जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -