घरCORONA UPDATE'अश्वगंधा' कोरोनाला रोखणार; आयआयटी दिल्लीचा दावा

‘अश्वगंधा’ कोरोनाला रोखणार; आयआयटी दिल्लीचा दावा

Subscribe

‘अश्वगंधा’ करोनावर प्रभावी ठरु शकते असा निष्कर्ष IIT दिल्ली आणि जपानी संस्थेच्या संशोधनात काढण्यात आला.

अमेरिकेपासून युरोपपर्यंत प्रत्येक देश कोरोना रोखण्यासाठी लस किंवा औषध संशोधनात गुंतलेला आहे. याच दिशेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी दिल्ली) आणि जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीने (एनआयएसटी) एकत्रित अश्वगंधातून कोरोना विषाणूचे औषध बनवता येऊ शकतं, असं संशोधन केलं आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती अश्वगंधा कोविड-१९ संसर्गाविरूद्ध एक प्रभावी उपचारात्मक आणि प्रतिबंधक औषध बनू शकते. संशोधक संघाला असं आढळलं की अश्वगंधा आणि प्रोपोलिसमध्ये (मधमाश्यांनी त्यांच्या पोळ्याचा प्रतिकार करण्यासाठी वापरलेली लाळ) कोरोना विषाणूविरोधात प्रभावी औषध बनवण्याची क्षमता आहे.

आयुर्वेद ही पारंपारिक वैद्यकीय प्रणाली हजारो वर्षांपासून आहे. गेल्या दशकात, आयआयटी दिल्ली आणि एआयएसटीचे संशोधक आधुनिक तंत्रासह पारंपारिक ज्ञानाचा अभ्यास करीत आहेत, असं आयआयटी दिल्ली येथील बायोकेमिकल अभियांत्रिकी आणि जैव तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि डीएआय लॅबचे समन्वयक प्रोफेसर डी. सुंदर यांनी सांगितलं. नवीन अभ्यासात असं दिसून आलं आहे की अश्वगंधाचा रासायनिक संयुग असलेल्या विथोनोनमध्ये शरीरात कोरोना विषाणूची प्रतिकृती रोखण्याची क्षमता आहे. यासह, मधमाश्यामध्ये एक रासायनिक कंपाऊंड कॅफेइक अॅसिड फिनेथिल ईस्टर (सीएपीई – Caffeic acid phenethyl ester) देखील आढळला आहे. ज्यामुळे मानवी शरीरात सार्स COV-2 एम प्रो ची क्रिया रोखू शकते. याबाबतचं वृत्त आजतक या वृत्तसंस्तथेनं दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आतापर्यंत ३९ हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ३८.७३ टक्के – आरोग्य मंत्रालय


हे संशोधन शरीरातील प्रथिने विभाजित करणारी सार्स COV-2 चे मुख्य द्रव्य जे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे मॅन प्रोटीझला लक्ष्य ठेवून केलं गेलं आहे. हे विषाणूची मानवाच्या शरीरात प्रतिकृती बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या संशोधनात आम्हाला आढळलेल्या दोन्ही संयुगांमध्ये मानवी शरीरातील विषाणूच्या प्रतिकृतीसाठी जबाबदार असलेले मुख्य एंजाइम मॅन-प्रोटीझचे मुख्य प्रथिने नष्ट करण्याची क्षमता आहे. हा अभ्यास सध्या पुनरावलोकनाच्या अधीन आहे आणि भविष्यात तो प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

er,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -