घरदेश-विदेशअफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक; ३० शेतकऱ्यांचा मृत्यू, ४० जण जखमी

अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक; ३० शेतकऱ्यांचा मृत्यू, ४० जण जखमी

Subscribe

अफगाणीस्तानमध्ये हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांऐवजी ३० शेतकऱ्यांचा नाहक जीव गेला असून ४० जण जखमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान, इसिसचे दहशतवादी हल्ले करत आहेत. या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी अफगाण हवाई दलाने बुधवारी रात्री एअर स्ट्राईक करण्याचे पाऊल उचलले. मात्र, या एअर स्ट्राईकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी शेतकरीच ठार झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात ३० शेतकऱ्यांना आपले नाहक प्राण गमवावे लागले असून ४० जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये राष्ट्रपती घणी थोडक्यात बचावले होते. तसेच दोनवेळा अमेरिकेच्या दूताबासासमोर बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. यामुळे ही कारवाई हाती घेण्यात आली होती. इसिसचे दहशतवादी लपले असल्याचा संशय आल्यामुळे त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला. मात्र, यामध्ये नाहक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ड्रोन हल्ल्यामध्ये शेतामध्ये काम करत असलेल्या ३० मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात ४० जण जखमी झाले असल्याची माहिती पूर्वेकडील नापंगरहार प्रांताचे सदस्य सोहराब कादरी यांनी दिली आहे. तसेच काबुलच्या संरक्षण मंत्रालयानेही या एअरस्ट्राईकची माहिती दिली आहे. मात्र, या हल्ल्यामुळे झालेले नुकसान सांगण्यात त्यांनी नकार दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सौदी अरेबियात तेल कंपनीच्या केंद्रांवर ड्रोन हल्ला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -