घरताज्या घडामोडीAyodhya :चांदीच्या विटांनी रचला जाणार राम मंदिराचा पाया, समोर आला पहिला फोटो!

Ayodhya :चांदीच्या विटांनी रचला जाणार राम मंदिराचा पाया, समोर आला पहिला फोटो!

Subscribe

अयोध्येतील बहुप्रतिक्षीत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) भूमीपूजनाची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑगस्टला मंदिराच्या भूमीपूजनासाठी जाणार आहेत.  अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारीही जोरात सुरू आहे. राम मंदिराचा पाया चांदीच्या विटांनी रचला जाणार आहे. त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. फैजाबादचे भाजप खासदार लल्लू सिंग यांनी हा फोटो ट्विट केला आहे.

- Advertisement -

लल्लू सिंग यांनी चांदीच्या विटांचा फोटो शेअर केला आहे आणि लिहीले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पवित्र वीटेची स्थापना करतील तेव्हा तीथे उपस्थित असण्याचं भाग्य मला मिळणार आहे. या अद्वितीय चांदीच्या वीटचे वजन २२ किलो ६०० ग्रॅम आहे.

५ ऑगस्टला भूमीपूजनानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) चांदीच्या वीटांनी मंदिर बांधण्यासाठी पायाभरणी करतील. ही चांदीची वीट अयोध्येत पोहोचली आहे.

- Advertisement -

राम मंदिराच्या रचनेत बदल करण्यात येणार असून हे मंदिर नागर शैलीच्या रचनेत बनवले जाणार आहे. या मंदिराला मोठे घुमट असणार असून तीन इतर छोटे घुमट असणार आहे.

अशी असणार मंदिराची रचना

मिळालेल्या माहितीनुसार; पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराची डिजिटल स्वरुपात रचना पाहणार आहेत. त्यानंतर या मंदिराची प्रतिकृती सर्वांना पाहता येणार आहे. मंदिराच्या विषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधल्या जातील. मंदिराला एकूण पाच कळस आणि पाच प्रवेशद्वार असणार असतील. मंदिराचा दरवाजा संगमरवर दगडाचा असेल. तर भूमीपूजनासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणली जाणार आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे १७ भाग असणार आहेत. यामध्ये मंदिराचे घुमट, गर्भगृह, कलश गोपुरम रथ, मंडप, पृथ्वी मंडप, परिक्रमा तोरणा, प्रदक्षिणा अधिष्ठाना असणार आहे.


हे ही वाचा – Ayodhya : राम मंदिराच्या रचनेत बदल, नागर शैलीत असणार नवे डिझाईन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -