घरअर्थजगतलवकरात लवकर उरका बॅंकेतील कामे, एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका राहणार बंद;...

लवकरात लवकर उरका बॅंकेतील कामे, एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका राहणार बंद; वाचा यादी

Subscribe

एप्रिल महिन्यात बॅंका जवळजवळ 15 दिवस बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यातील बॅंकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

तुमची ब‌ॅंकेत काही कामे असतील तर ती तुम्ही 31 मार्चपूर्वीच उरका. कारण एप्रिल महिन्यात बॅंका जवळजवळ 15 दिवस बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यातील बॅंकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

समोर आलेल्या वेळापत्रकानुसार, एप्रिलमध्ये 15 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह दुस-या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. एप्रिलमध्ये महावीर जयंती, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, गुड फ्रायडे, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, संक्रांती बिजू महोत्सव/बिसू उत्सव, तामिळ नववर्ष दिन, विशू/ बोहाग बिहू, बंगाली नववर्ष दिन, शब- एल-कद्र ईद- उल- फित आणि रमजान ईद यादिवशी बॅंका बंद राहणार आहेत.

- Advertisement -

या दिवशी बॅंका राहणार बंद

1 एप्रिल– वार्षिक खाती बंद झाल्यामुळे (मिझोराम, चंदीगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेश ) वगळता बँका बंद राहणार आहेत.

4 एप्रिल– महावीर जयंतीनिमित्त गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, राजस्थान, लखनऊ, नवी दिल्ली, छत्तीसगढ, झारखंड या राज्यांमध्ये बॅंका बंद राहणार आहेत.

- Advertisement -

5 एप्रिल– बाबू जनजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबादमध्ये बॅंका बंद राहणार आहेत.

7 एप्रिल– गुड फ्रायडेनिमित्त त्रिपुरा, गुजरात, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, श्रीनगर वगळता बहुतांश राज्यांमध्ये बॅंकांना सुट्टी असणार आहे.

14 एप्रिल– डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती/बोहाग बिहू/ चिरावबा/ वैसाखी/बैसाखी/तामिळ नववर्ष दिन/ महाविसुभा संक्रांती/ बिजू महोत्सव/ बिसू उत्सव या दिवशी बॅंका बंद राहतील.

15 एप्रिल– त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये विशू/ बोहाग बिहू/ हिमाचल दिन/ बंगाली नववर्ष दिन निमित्त बॅंका बंद आहेत.

18 एप्रिल– शब-ए. कदरानिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बॅंका बंद राहणार आहेत.

21 एप्रिल– त्रिपुरा, जम्मू आणि श्रीनगर, केरळमध्ये ईद- उल फितर (रमजान ईद)/ गरिया पूजा- जुमत-उल- विदा निमित्त बॅंका बंद राहणार आहेत.

22 एप्रिल – रमजान ईद ( ईद-उल- फितर ) आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहतील.

( हेही वाचा: TMC ने केले काॅंग्रेसच्या Black Protest चे समर्थन; मल्लिकार्जून खर्गेंनी मानले आभार )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -