घरदेश-विदेशबीबीसीच्या निवेदिकेचा संशयास्पद मृत्यू

बीबीसीच्या निवेदिकेचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

विकी सोशल मीडियावर कितीही अॅक्टिव्ह असली तरी तिच्या खासगी आयुष्याबाबत मात्र अनेकांना माहिती नाही. तिच्या तीन मुलांशिवाय तिने सोशल मीडियावर काहीही शेअर केलेले नाही.

बीबीसी इंग्लंडची निवेदिका विकी आर्चर हिचा मंगळवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. बीबीसीच्या श्रोफायरमध्ये ती आफ्टरनून ड्राईव्हटाईम शो करत होती. मृत्यूच्या काहीच तासांपूर्वी तिने ट्विट केले होते. ज्यात तिने ‘”HELP PLEASE Children are away for 5 days on holiday’ असे म्हटले होते.अशी माहिती द सन युकेने दिली. नेहमीच हसत असणारी विकी अचानक कशी जाऊ शकते? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  तिच्या अकाली एक्झिटने बीबीसीवर मात्र शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

मृत्यूबाबत कुटुंबियांचे मौन

विकीची मृत्यू आधीचे शेवटचे ट्विट काढून टाकण्यात आले असून याचा पोलीस अधिक तपास करत आहे. विकीची मुले सुट्टयांसाठी बाहेर होती आणि ती घरात एकटी होती. त्यामुळे तिच्यासोबत घातपात झाला का ? अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान तिच्या मृत्यूचे कारण अद्याप कळालेले नाही. ४१ वर्षीय विकीच्या या अकाली एक्झिटमुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. या संदर्भात विकीच्या कुटुंबियांशी विचारणा केल्यावर त्यांनी सध्या या बाबत बोलणे टाळले असल्याची माहिती मिररच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 

- Advertisement -

विकीचे खासगी आयुष्य गुलदस्त्यात

विकी सोशल मीडियावर कितीही अॅक्टिव्ह असली तरी तिच्या खासगी आयुष्याबाबत मात्र अनेकांना माहिती नाही. तिच्या तीन मुलांशिवाय तिने सोशल मीडियावर काहीही शेअर केलेले नाही. त्यामुळे तिच्या नवऱ्याबाबतची अधिक माहिती कोणालाच नाही. मृत्यूच्यावेळी तिचा पती तिच्यासोबत होता की नाही? हे देखील कळू शकलेले नाही.


(विकीची तीन मुलं, सौजन्य – विकी इन्स्टाग्राम) 

२० वर्ष निवेदिका म्हणून केले काम

बीबीसीत विकी गेली २० वर्षे दुपारचा खास शो करत आहे. अॅडम ग्रीन सोबत ती हा शो करत होती. तिच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे तिने अनेकांची मने जिंकली होती. अॅडमने देखील तिच्या जाण्याचे दु:ख ट्विटरवरुन व्यक्त केले आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायची. तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये तिच्या आनंदी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -