घरमुंबईचेंबूरमध्ये बीपीसीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट; ४५ जखमी

चेंबूरमध्ये बीपीसीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट; ४५ जखमी

Subscribe

चेंबूरमध्ये बीपीसीएल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये कंपनीला मोठी आग लागली आहे. कंपनीच्या आसपासच्या परिसरामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चेंबूरच्या माहुल येथे कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. बीपीसीएल कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळावर पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाच्या ३० पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी २५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

स्फोटामुळे माहुलगाव हादरले

मुंबईतील चेंबूर माहुल परिसरातील बीपीसीएल रिफायनरी कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. ३ वाजता ही घटना घडली आहे. हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये हा स्फोट झाला असून या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ येत आहेत. कंपनीत स्फोट झाल्यानंतर माहुलगावला मोठा हादरा बसला. या परिसरातील घरांच्या खिडक्याच्या काचा फुटल्या आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान आसपासच्या कंपनींना खाली करण्यात आला आहे. दरम्यान या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

- Advertisement -

कंपनीमध्ये ३०० ते ४०० कर्मचारी अडकले

बीपीसीएल रिफायनरी कंपनीतील ३०० ते ४०० कर्मचारी अडकले आहेत. बीपीसीएल रिफायनरी कंपनीला खाली करण्यात आले आहे. या कंपनीच्या आसपास असणाऱ्या कंपनींना देखील खाली करण्यात आले आहे. या आगीमध्ये २१ पेक्षा जास्त कर्मचारी जखमी झाले असून एक कर्मचारी गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या ठिकाणी मोठ्याप्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. घटास्थळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -