घरदेश-विदेश'हे' झाड पक्ष्यांना खातं...

‘हे’ झाड पक्ष्यांना खातं…

Subscribe

काही अपवाद वगळता बहुतांशी पक्षी हे शाकाहारी असतात. अनेक पक्षी झाडांवरील पानं, फुलं आणि फळं खाऊन आपलं पोट भरतात. मात्र एखादे झाडच जर पक्ष्यांना खात असेल तर? हे वाचून तुम्ही चक्रावले असाल. मात्र जगाच्या पाठीवर अशी काही दुर्मिळ झाडं आहेत. ही झा़डं रंगीबेरंगी पक्ष्यांना आपले भक्ष्य बनवतात.

पक्ष्यांना खाणारे ‘पिसोनिया’

- Advertisement -

घटपर्णी या वनस्पतीबद्दल आपण शाळेमध्ये ऐकले असेल. ही वनस्पती किटकांना आपल्याकडे आकर्षण करुन त्यांची शिकार करते. भारतात काही ठिकाणी हे झाड आढळते. मात्र, भारताबाहेर आढळणरे ‘पिसोनिया’ नावाचं एक अनोखं झाड चक्क पक्ष्यांची शिकार करतं. विशेषत: अमेरिका आणि न्युझिलंडमधील काही भागांत पिसोनिया झाडं आढळतात.

प्रातिनिधीक छायाचित्र (सौजन्य- iStock)

अशी होते पक्ष्यांची शिकार

- Advertisement -

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, पिसोनिया झाडामधून रात्रीच्यावेळी एक निळसर रंगाचा चमकदार द्राव बाहेर पडतो. याकडे पक्षी आकर्षित होतात आणि झाडांवर जाऊन बसतात. झाडावर येताच हे पक्षी तिथल्या पानांमध्ये फसतात आणि आपला जीव गमवून बसतात. पिसोनियाच्या पानांची-फाद्यांची नैसर्गिक रचनाच अशी विचीत्र आहे, की त्यामध्ये फसलेला पक्षी सुखरुप बाहेर पडणं कठीणच.

दरम्यान पक्ष्यांचा जीव घेणाऱ्या या झाडाला ‘बर्ड कॅचर ट्री’ तसंच ‘बर्डलाईम ट्री’ या नावांनीही संबोधले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -