घरमुंबई'सह्याद्री' अतिथीगृहाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे गैरवापर!

‘सह्याद्री’ अतिथीगृहाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे गैरवापर!

Subscribe

‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृहाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे गैरवापर होत असल्यची घटना नुकतीच समोर आली आहे. सध्या रमजान निमित्त सर्वत्र इफ्तार मेजवानीचे आयोजन सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना असलेल्या राष्ट्रीय मुस्लीम मंचातर्फे आज (४ जून)  मुंबईतील ‘सह्याद्री’ या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण आता इफ्तारचा हा कार्यक्रम वादात अडकला आहे.

सह्याद्री अतीथीगृह कोणत्याही संघटनेला वापरता येत नाही

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मिळवलेल्या माहितीनुसार सह्याद्री राज्य अतिथीगृह फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री, मुख्यसचिव, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यशाळा/पत्रकार परिषदा आयोजित करण्यासाठीच वापरण्यात येते, असे २०१५ साली करण्यात आलेल्या नियमात नमूद केले आहे. त्यामुळे कुठल्या नियमानुसार सह्याद्री अतीथीगृहात पार्टी करण्यास परवानगी देण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -
letter to govt
शकील अहमद शेख आणि अॅडव्होकेट आदिल खत्रींनी सरकारला लिहिलेले पत्र

मुस्लीम मते मिळविण्यासाठी भाजपचा खटाटोप

नियमात बसत नसतांना देखील अशा प्रकारची परवानगी देण्यामागे कुठेतरी भाजप मुस्लीमांची मते मिळवण्यासाठी तर असे करत नाही ना? तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना राष्ट्रीय मुस्लीम मंचाद्वारे सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख आणि अॅडव्होकेट आदिल खत्री यांनी केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सरकारी अतिथीगृहात होणार असलेल्या इफ्तार पार्टीचे आयोजन रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर आयोजनासाठी परवनगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर करावीईची देखील मागणी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन केल्यामुळे सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुस्लिमांच्या अनेक संघटनांकडूनही याला विरोध करण्यात येत आहे.

इफ्तारने ‘आरएसएस’चे हदयपरिवर्तन होत असेल तर स्वागतच – नवाब मलिक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इफ्तार पार्टी करावीशी वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वत: लोकांना निमंत्रण द्यायला हवे. आम्ही सगळे लोक जावू आणि त्यांचं स्वागतच करु. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हदयपरिवर्तन होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे असा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इफ्तार पार्टी आयोजनावर लगावला आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हृदय बदलत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही इफ्तार पार्टीचे आयोजन करावे आम्ही स्वागतच करु आणि आम्ही त्याठिकाणी हजर राहू असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -