घरदेश-विदेशभाजपचं राज्यसभेत शतक, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात कोणत्या पक्षाचे किती सदस्य? जाणून घ्या

भाजपचं राज्यसभेत शतक, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात कोणत्या पक्षाचे किती सदस्य? जाणून घ्या

Subscribe

भाजपने राज्यसभेत शतक ठोकले आहे. राज्यसभेत १९९० नंतर १०० चा आकडा गाठणारा हा पहिलाच पक्ष ठरला आहे. राज्यसभेने अधिकृतपणे माहिती दिली. आसाममधून एक, त्रिपुरा आणि नागालँडमधून एक अशा तीन राज्यसभेच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. नुकत्याच सहा राज्यांतील १३ जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. २०१४ मध्ये भाजपचे ५५ सदस्य होते आणि ही संख्या १०० वर गेली आहे.

राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. यापूर्वी १९९० मध्ये काँग्रेसचे १०८ सदस्य होते. काँग्रेसची सदस्य संख्या आता ३० वर आली आहे. आता लवकरच सुमारे ५२ जागांवर मतदान होणार आहे, जे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील जागा असतील.

- Advertisement -

जर १३ राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांबद्दल चर्चा करायची झाली तर, भाजपने पंजाबमध्ये एक जागा गमावली, परंतु तीन ईशान्येकडील राज्यांमधून प्रत्येकी एक जागा आणि हिमाचल प्रदेशातील सर्व जागा मिळाल्या. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजप अजूनही राज्यसभेत स्वतःच्या बहुमतापासून दूर आहे. २०१४ नंतर २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाले. गेल्या काही वर्षांत भाजपने बहुतांश राज्यांमध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे किंवा परिस्थिती सुधारली आहे.

राज्यसभेतील पक्षनिहाय सदस्य संख्या

भारतीय जनता पार्टी – १०१
काँग्रेस – ३०
तृणमूल काँग्रेस – १३
द्रविड मुन्नेत्र कळघम – १०
बिजू जनता दल – ९
तेलंगणा राष्ट्र समिती – ६
वायएसआर काँग्रेस पार्टी – ६
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम – ५
समाजवादी पक्ष – ५
राष्ट्रीय जनता दल – ५
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – ५
जनता दल युनायटेड – ४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ४
बहुजन समाज पक्ष – ३
शिवसेना – ३
शिरोमणी अकाली दल – ३
आम आदमी पार्टी – ३
भारतीय कम्युनिस्ट पक्ष – २
तेलुगु देसम पार्टी – १
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट – १
आरपीआय (आठवले) – १
जनता दल सेक्युलर – १
इंडियन युनियन मुस्लिम लीग – १
असम गण परिषद – १
पट्टाली मक्कल काची – १
मारुलामार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम – १
तमिळ मनिला काँग्रेस (मूपनार) – १
झारखंड मुक्ती मोर्चा – १
नॅशनल पीपल्स पार्टी – १
मिझो नॅशनल फ्रंट – १
केरळ काँग्रेस (एम) – १
युनायटेड पीपल्स पार्टी (लिबरल) – १
स्वतंत्र – २
नामांकित -३
रिक्त पदे (बिहार – २, जम्मू आणि काश्मीर – ४, कर्नाटक – १, पंजाब – १, तेलंगणा – १) ९

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -