घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला वेग, भाजपकडून राजनाथ सिंहांवर सोपवली जबाबदारी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला वेग, भाजपकडून राजनाथ सिंहांवर सोपवली जबाबदारी

Subscribe

भाजपकडून वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून येत्या १८ जुलै २०२२ रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी करण्यास येत आहे. विरोधकांची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली आहे. यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग येताना दिसत आहे. भाजपकडून वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी राजनाथ सिंह आणि पक्षप्रमुख जे.पी. नड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. ते निवडणुकीपूर्वी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एकमत करण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा करणतील. राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, टीएमसीच्या ममता बॅनर्जी, आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. खरगे यांच्या सोबत झालेल्या भेटीदरम्यान उपस्थित काँग्रेस नेत्याने सांगितले की, ही एक औपचारिक भेट आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीला ते उपस्थित नव्हते. आप, टीआरएस, बीजेडी, एसएडी, वायएसआरसीपी आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे.

- Advertisement -

शरद पवारांचा नकार, दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरु

विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर एकमत झाले होते.परंतु शरद पवार यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. यामुळे दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. तसेच सक्रिय राजकारणातील उमेदवार नसावा यावर एकमत झाले आहे. परंतु शरद पवारांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आता नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. ही बैठक तब्बल दोन तास चालली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा आणि रणनितीवर चर्चा करण्यात आली आहे. सध्या काँग्रेसकडून कोणताही उमेदवार देण्यात आला नाही. परंतु विरोधी पक्षांमधील उमेदवार ठरवण्यासाठी इतर पक्षांना पाठिंबा असेल असे मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रपतिपदासाठी राजकारणाबाहेरचा उमेदवार हवा, पवारांच्या नकारानंतर विरोधकांच्या बैठकीत शिवसेनेची भूमिका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -