घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपदासाठी 11 उमेदवारांचा अर्ज दाखल, भाजपकडून सस्पेन्स कायम

राष्ट्रपतीपदासाठी 11 उमेदवारांचा अर्ज दाखल, भाजपकडून सस्पेन्स कायम

Subscribe

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अर्ज दाखल करण्यात आला आहे. सायरा बानो मोहम्मद पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. तर लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील 11 नेत्यांनी अर्ज दाखल केला आहे. यामधील एक अर्ज बाद करण्यात आला आहे. पूर्ण कागदपत्र सादर केले नाही यामुळे अर्ज बाद केल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यावरुन भाजपच्या गोटात अद्याप चर्चा सुरुच आहे. निवडणूक येत्या 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत येत असल्यामुळे निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 29 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. 15 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच भाजपकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आला नाही. परंतु 11 विरोधी पक्षातील नेत्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांनी अर्ज दाखल केला आहे. सत्ताधारी भाजपमधील नेते राजनाथ सिंह उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातून राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अर्ज दाखल करण्यात आला आहे. सायरा बानो मोहम्मद पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. तर लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा अर्ज दाखल केला आहे. लालू प्रसाद यादव हे राजदचे प्रमुख नाहीत. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. ते हौशी उमेदवार आहेत असे सांगण्यात येत आहे. एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामधील एक अर्ज रद्द करण्यात आला आहे. अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यामुळे अर्ज बाद करण्यात आला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया जाणून घ्या

राष्ट्रपतींची निवड राज्यघटनेनुसार समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे गुप्त मतदानाद्वारे केली जाते. राष्ट्रपतींची निवडणूक एक निर्वाचक मंडळाद्वारे केली जाते. राज्यसभा आणि लोकसभा किंवा विधानसभेवर निवडून आलेले प्रतिनिधी भाग घेतात. यामध्ये दिल्ली आणि पुद्दुचेरीच्या विधानसभेचा समावेश होता. राज्यसभा आणि लोकसभा किंवा राज्य विधानसभांचे नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार नसतो. तसेच विधान परिषदेचे नेते या निवडणुकीत मतदान करत नाहीत. संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल आणि यानंतर मतमोजणीची प्रक्रिया दिल्लीत पार पडेल.

- Advertisement -

राष्ट्रपती निवडणुकीसाठी ११ अर्ज दाखल

1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
9. लालू प्रसाद यादव, बिहार
10. ए. मणिथन, तामिळनाडू
11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश


हेही वाचा : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला वेग, भाजपकडून राजनाथ सिंहांवर सोपवली जबाबदारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -