घरदेश-विदेशआजीने आणीबाणी लावली होती, लक्षात आहे का? भाजपाचा काँग्रेसवर पलटवार

आजीने आणीबाणी लावली होती, लक्षात आहे का? भाजपाचा काँग्रेसवर पलटवार

Subscribe

नवी दिल्ली : वाढती महागाई आणि बेकारीवरून आक्रमक होत काँग्रेसने आज देशभरात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस खासदार राहुला गांधी यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. पण, आजीने आणीबाणी लावली होती, लक्षात आहे का? असा सवाल करत भाजपाने त्यावर पलटवार केला आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच काँग्रेस अ्ध्य़क्ष सोनिया गांधी यांच्यासह विविध नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यासह महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न आज काँग्रेसने केला. ‘या देशाने जे ७० वर्षांत कमावले ते आठ वर्षांत या सरकारने गमावले. आज देशात लोकशाही उरलेली नाही, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – होऊ दे खर्च : करदात्या मुंबईकरांच्या पैशांवर प्रभागरचनेत वारंवार बदल!

त्याला भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेत जेव्हा महागाईवर चर्चा सुरू असते, तेव्हा राहुल गांधी सभागृहात थांबत नाहीत, सभात्याग करतात, असे त्यांनी सांगितले. तसेच नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांनी पाच लाख रुपये गुंतवून ५००० कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी यांच्या आजीने देशात आणीबाणू लागू केली होती. त्या काळात मोठ्या-मोठ्या पत्रकारांना जेलमध्ये बंद केले होते. राहुल गांधी यांच्या आजीने ‘कमिटेड ज्युडिशियरी’बद्दल म्हटले होते. तुम्हाला काही आठवते का? तुम्ही आम्हाला लोकशाहीचा सल्ला देत आहात, पण तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला.

भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी राहुल गांधी देशावर आरोप करत आहेत. ते जामीनावर का आहेत, हे त्यांनी सांगावे. काँग्रेस पक्ष आज एका कुटुंबाच्या ताब्यात आहे. आता हे कुटुंब पक्षाच्या मालमत्तेवर कब्जा करू पाहात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – …तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, काँग्रेस नेत्यांना पोलिसांची नोटीस

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -