घरदेश-विदेशपोटनिवडणुकीत भाजपचाच विजय सपाच्या ताब्यातील दोन्ही जागांवर कब्जा

पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय सपाच्या ताब्यातील दोन्ही जागांवर कब्जा

Subscribe

लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे, तर आझमगडमध्येही भाजपचाच विजय झाला आहे. रामपूरमध्ये भाजपच्या घनश्याम लोधी यांनी सपा उमेदवार असीम राजा यांचा ४२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला, तर आझमगडमध्ये भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव निरहुआ आघाडीवर आणि सपाचे धर्मेंद्र यादव दुसर्‍या क्रमांकावर राहिले. आझम खान यांच्या राजीनाम्यामुळे आझमगड आणि अखिलेश यांच्या राजीनाम्याने रामपूरची जागा रिक्त झाली होती.

पंजाबमधील संगरूर येथे शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजीत सिंग मान ५ हजार ८२२ मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग दुसर्‍या, तर काँग्रेसचे दलवीर गोल्डी तिसर्‍या स्थानावर राहिले. येथे अकाली दल आणि भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

- Advertisement -

विधानसभेच्या ७ जागांसाठी २३ जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये आपने दिल्लीतील राजेंद्रनगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपने ४ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली, तर झारखंडमधील मंदार मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -