घरदेश-विदेशबहीण-भाऊ गेली वीस वर्षे एकाच खोलीत कैद, नातेवाईकांनीही सोडली साथ...

बहीण-भाऊ गेली वीस वर्षे एकाच खोलीत कैद, नातेवाईकांनीही सोडली साथ…

Subscribe

दोघे भाऊ-बहिण खरकटं आणि कचरा खाऊन जगत होते आणि त्यांची सेवा करायला कुणीच नव्हतं. अंबाला कॅन्टमध्ये भावंडांचे नातेवाईक राहतात.

एम.ए. बी.एड. झालेली बहिण आणि बारावी पास असलेला भाऊ हे दोघे गेली २० वर्षे एकाच खोलीत अगदी नरकासारखं जीवन जगत होते. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. याहूनही धक्कादायक म्हणजे हे दोघेही भाऊ-बहिण एका डॉक्टरची अपत्ये आहेत. इतकं असताना त्यांच्या वाट्याला या नरकयातना कशा आल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागची खरी कहाणी ऐकल्यानंतर तुमचं मन आणखी पिळवटून जाईल.

ही कहाणी आहे पंजाबच्या लुधियानामधील बोह गावातील भाऊ आणि बहिणीची…हे दोघे बहिण-भाऊ गेल्या २० वर्षांपासून एकाच खोलीत बंद होते. त्यांचे वडील डॉक्टर असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. हे दोघे बहिण-भाऊ मतिमंद असून वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्या नातावाईकांनी सुद्धा त्यांच्याकडे पाठ फिरवली. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. त्यांना मदत म्हणून माणुसकीच्या नात्याने शेजाऱ्यांनी आतापर्यंत त्यांना जेवण दिलं. म्हणूनच हे भाऊ-बहीण आजपर्यंत जिवंत राहिले. मतिमंद असल्याने त्यांना कामधंदा देखील करता येत नव्हता. वडिलांच्या निधनाने निराधार झालेले भावंड बंद खोलीत आपलं आयुष्य घालवू लागले.

- Advertisement -

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील सूरज प्रकाश शर्मा हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. इंदू शर्मा आणि सुनील शर्मा असं या दोघा बहिण-भावाचं नाव आहे. हे दोघेही मानसिकरित्या कमकुवत असल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. दोघे भाऊ-बहिण खरकटं आणि कचरा खाऊन जगत होते आणि त्यांची सेवा करायला कुणीच नव्हतं. अंबाला कॅन्टमध्ये भावंडांचे नातेवाईक राहतात.

लुधियानाच्या ‘मनुख्ता दी सेवा सबसे बडी सेवा’ या संस्थेने बंद खोलीत कैद असलेल्या या बहिण-भावाची सूटका केली. या दोघांना बाहेर काढण्यासाठी जेव्हा संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा तिथली अवस्था, दुर्गंधी व अस्वच्छता पाहून सारेच जण थक्क झाले. या संस्थेने दोघा बहिण-भावंडाचं रेस्क्यू केलं आणि त्यांना योग्य ठिकाणी हलवण्यात आले.

- Advertisement -

अंबाला शहरातील जोगीवाडा येथूनही एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. त्याचीही मानसिक स्थिती चांगली नाही. अनेक वर्षांपासून तो रोज सकाळी घरातून बाहेर पडायचा आणि भीक मागून जेवण करायचा. रात्री तो आपल्या घरी परतायचा. संस्थेचे लोक त्याच्या खोलीत गेले असता तिथली सुद्धा अवस्था अत्यंत घाणेरडी होती.

संस्थेचे सेवक मिंटू माळवा यांनी सांगितलं की, अशा लोकांची त्यांच्या वतीने सुटका केली जाते, जे मंद असतात. ज्यांच्या मदतीला कोणी नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांना अंबाला येथूनही या लोकांचा व्हिडिओ मिळाला होता. त्यानंतर त्यांनी वंदे मातरम दलासह या लोकांची सुटका केली आणि आता त्यांना चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -