घरताज्या घडामोडीPM ताफा अडवल्याच्या ठिकाणाच्या नजीकच सतलेज नदीत आढळली संशयित बोट; BSF मार्फत...

PM ताफा अडवल्याच्या ठिकाणाच्या नजीकच सतलेज नदीत आढळली संशयित बोट; BSF मार्फत तपासाला वेग

Subscribe

सतलेज नदीमध्ये ही बोट सापडल्यानंतर सुरक्षा एजेंसी अलर्ट मोडमध्ये आली आहे. ही बोट पाकिस्तानातून आल्याचे म्हटले जात आहे.

सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफला आज सतलेज नदीत एक संशयित बोट सापडली आहे. या बोटीचा सध्या तपास सुरू आहे. ही बोट तिथपर्यंत कशी पोहोचली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बीएसएफचे अधिकारी याचा तपास करत आहेत. सुत्रांच्या मते, बीओपी टीटी मलजवळ ही बोट सापडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंजाबमध्ये ज्या ठिकाणी ताफा अडवला होता, तिथून ५० किमी दूर ही बोट सापडल्यामुळे याचा अधिक तपास केला जात आहे. सध्या या बोटीचा पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अडवण्याशी काही संबंध आहे का? याचा तपास अधिकारी करत आहेत.

सतलेज नदीमध्ये ही बोट सापडल्यानंतर सुरक्षा एजेंसी अलर्ट मोडमध्ये आली आहे. ही बोट पाकिस्तानातून आल्याचे म्हटले जात आहे. पण अजूनपर्यंत अधिकृतपणे या बोटीबाबत काहीही सांगण्यात आले नाही. या बोटीत काय मिळले, याबाबतची माहिती अजूनपर्यंत समोर आली नाही. सध्या सुरक्षा एजेंसी तपास करत आहे.

- Advertisement -

नक्की काय घडले?

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचार सुरू करण्यास जात होते. सकाळपासून फिरोजपूरमध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु काही शेतकरी आंदोलकांमुळे मोदींची रॅली रद्द होईल याबाबत कोणाला अंदाज नव्हता. मोदी भटिंडाला पोहोचले होते. येथून ते हेलिकॉप्टरमधून हुसैनीवालामधील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाणार होते. परंतु हवामान चांगले नसल्यामुळे मोदींनी २० मिनिटे वाट पाहिली. परंतु हवामानात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे मोदींनी रस्ते मार्गाने राष्ट्रीय शहीद स्मारकला जाण्याचा निर्णय घेतला. २ तास या ठिकाणी जाण्यासाठी लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर मोदी रस्ते मार्गाने पुढे निघाले. राष्ट्रीय शहीद स्मारकाहून ३० किमी अगोदर मोदींचा ताफा जेव्हा उड्डाणपुलावर पोहोचला, तेव्हा काही आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवला. त्यामुळे १५ ते २० मिनिटे मोदी उड्डाणपुलावर अडकले. ही पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक असल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – PM Modi Security Lapse : हा शेतकऱ्यांचा रोष आहे का?, मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवर राकेश टिकैत यांचा सवाल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -