‘डेकोय प्रोटीन’ कोरोना विषाणूला रोखणार?

२००२ च्या सार्स विषाणूलाही 'डेकोय प्रोटीन' पद्धतीने प्रतिबंधित करण्यात आलं होतं. लेसेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी यावर काम सुरू केलं आहे.

corona virus

जगभर वेगाने पसरणार्‍या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत एक लाख ६६ हजार १३० लोकांचा बळी गेला आहे, तर २४ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. ज्या वेगाने त्याचा प्रसार होत आहे त्याचा पराभव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. बर्‍याच देशांमध्ये कोरोना विषाणूवर लस बनवण्याचं काम वेगाने सुरू आहे, परंतु आता शास्त्रज्ञांसमोर एक नवीन पर्याय आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, डेकॉय प्रोटीन असलेल्या इंजेक्शनद्वारे या संसर्गास प्रतिबंध केला जाऊ शकतो. कारण २००२ च्या सार्स विषाणूलाही अशाच प्रकारे प्रतिबंधित करण्यात आलं होतं. लेसेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी यावर काम सुरू केलं आहे. वैज्ञानिकांना असा विश्वास आहे की कोरोना विषाणू फुफ्फुस आणि वायुमार्गाच्या पेशींच्या पृष्ठभागावर रिसेप्टरद्वारे शरीरात प्रवेश करतो, ज्याला एसीई-२ रिसेप्टर म्हणून ओळखलं जातं.


हेही वाचा – Coronavirus: वुहानचं सत्य बाहेर आणणारे ३ पत्रकार बेपत्ता


लेसेस्टर युनिव्हर्सिटी मधील संशोधन टीम एक प्रथिन विकसित करण्याचं काम करत आहे. एका सिद्धांतानुसार, जर विषाणू शरीरात शिरला तर एसीई -२ विषाणू शोषून घेईल. हे कोरोनाच्या लक्षणांना प्रतिबंध करेल. कोरोना विषाणूविरूद्ध या पध्दतीकडे मोठ्या आशेने बघत आहेत. प्रोफेसर निक ब्रिंडल म्हणतात, “विषाणूला पकडण्यासाठी आकर्षक डेकोय प्रोटीन तयार करुन त्याचे संक्रमण होण्यापासून रोखणे हे आमचं लक्ष्य आहे.” रिसेप्टर्स आणि फुफ्फुसांच्या पेशींना हायजॅक करून, विषाणू संपूर्ण शरीरात पसरतो. अशा परिस्थितीत ही पद्धत यशस्वी झाल्यास जगभर पसरलेल्या या प्राणघातक संसर्ग रोखण्याची शक्यता आहे. लेसेस्टर विद्यापीठातील संशोधकांना पुढील १२ आठवड्यांत त्यांच्या चाचण्यांमधून प्राथमिक निकालांची अपेक्षा आहे. जर हा पर्याय यशस्वी झाला तर जगभरात या प्राणघातक आजाराची नवीन घटना रोखण्याचा एक मार्ग सापडेल.