‘कंडोम सोबत ठेवा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा’

कंडोम सोबत ठेवा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा', असे संतापजनक विधान चित्रपट निर्माता डॅनियल श्रवण यांनी केले आहे.

filmmaker daniel shravan
चित्रपट निर्माता डॅनियल श्रवण

हैदराबादच्या २६ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर निर्दयपणे बलात्कार करून तिला जाळल्याप्रकरणी देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची देखील मागणी केली जात असतानाच चित्रपट निर्माता डॅनियल श्रवण यांने हैद्राबादच्या बलात्कार घटनेनंतर सोशल मीडियावर एक संतापजनक विधान केले आहे. ‘पीडित तरुणीची बलात्कारानंतर हत्या होऊ नये म्हणून देशात बलात्कार कायदेशीर करण्यात यावा. तसेच कंडोम सोबत ठेवा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा’, अशी देखील त्यांनी मागणी केली आहे.

काय म्हणाला हा डॅनियल?

चित्रपट निर्माता डॅनियल श्रवण यांनी आपल्या पोस्टमधून एक विकृत असा सल्ला देखील दिला आहे. तो म्हणाला आहे की, ‘मुली या पुरुषांच्या वासनेला नकरा देऊ शकत नाही. तसेच १८ वर्षांच्या मुलींने सोबत आपल्यासोबत कंडोम आणि डेंटल डॅम्स ठेवत जा. जेणेकरुन बलात्कार करणाऱ्याची वासना देखील पूर्ण होईल आणि हत्या देखील होणार नाही’, अशी संतापजनक पोस्ट डॅनियलने केली आहे.

 

तसेच तो पुढे देखील म्हणाला आहे की, बलात्कारा दरम्यान पुरुषाची लैंगिक वासना पूर्ण होत नाही, त्यामुळे तो त्या पीडितीची हत्या करतो, असे म्हत त्यांनी विरप्पनचेही उदाहरण दिले आहे. विरप्पनच्या मृत्यूनंतर देखील अपहरण, हत्या आणि अवैध धंदे बंद झालेले नाहीत. निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर देखील बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुले सरकारने ‘रेप विदाऊट व्हायलन्स स्किम’ आणली पाहिजे, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेटकऱ्यांनी हल्ला चढवल्यानंतर पोस्ट डिलीट

डॅनियल श्रवण यांनी आपल्या पोस्टमधून अशी संतापजन पोस्ट केल्यानंतर त्याच्यावर नेटकऱ्यांनी चौफर हल्ला चढवला आहे. अनेकांनी हल्ला केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट देखील केली आहे. मात्र, तोपर्यंत अनेकांनी त्याच्या पोस्टचे स्क्रिन शॉट करुन सर्वत्र व्हायरल केले आहेत.


हेही वाचा – Video: संसदेत खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज