Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोळसा घोटाळा प्रकरणी ममता बॅनर्जींच्या सूनेला CBIची नोटीस

कोळसा घोटाळा प्रकरणी ममता बॅनर्जींच्या सूनेला CBIची नोटीस

कोळसा घोटाळा प्रकरणात रुजिरा बॅनर्जी यांच्या खात्यात काही गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहते आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकारण तापलं आहे. भाजपकडून मागील काहीदिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधण्यात येत आहे. आता सीबीआयने कोळसा घोटाळा प्रकरणी ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. भाजप सातत्याने अभिषेक बॅनर्जीला निशाणा करत आहेत. कोळसा घोटाळा प्रकरणी कोळसा माफियांशी अभिषेक बॅनर्जीची पत्नी रुजिरा बॅनर्जीचा संबंध असल्याचा आरोप करत सीबीआयने नोटीस पाठवली आहे. सीबीआयचे एक पथक अभिषेक बॅनर्जीच्या घरी नोटीस देण्याकरिता गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयची टीम अभिषेक बॅनर्जीच्या घरी पोहोचले तेव्हा घरी कोणीही नव्हते. या टीममध्ये ५ अधिकाऱ्यांचा समावेश होते. घरी कोण नसल्याने पथकाने दरवाजावर नोटीस लावली आहे. तसेच नोटीसमध्ये फोन क्रमांक नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यावर संपर्क साधण्यासही सांगितले आहे. कोळसा घोटाळ्यामध्ये रुजिरा बॅनर्जीचा कोळसा माफियांशी संबंध असल्याचा संशय असल्यामुळे सीबीआय चौकशी करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भारतातील ‘या’ राज्यात तयार होणार जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीच्या पत्नीला सीबीआयने चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सीबीआयचे पथक अभिषेक बॅनर्जींच्या घरी येऊन कोळसा प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात रुजिरा बॅनर्जी यांच्या खात्यात काही गैरव्यवहार झाला असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. सध्या कोळसा घोटाळ्यात अनूप मांझीची पोलीस आणि सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने पश्चिम बंगालमध्ये ४ जिल्ह्यांमध्ये १३ ठिकाणी छापे टाकले होते.

- Advertisement -