घरदेश-विदेशकाँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी; ५० लाखांची रोकड...

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी; ५० लाखांची रोकड जप्त

Subscribe

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन सीबीआयने ही छापे टाकले आहेत. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, बंगळूर ग्रामीणचे खासदार डी. के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयने झडती घेतली आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. याप्रकरणी सीबीआयने कर्नाटकमधील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर आज धाडी टाकल्या. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने ५० लाख रुपये जप्त केले आहेत. दरम्यान, डीके शिवकुमार यांच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी जमली असून सर्वजण छापेमारीचा विरोध करीत आहेत.

- Advertisement -

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सीबीआयच्या या छापेमारीचा निषेध केला. भाजपने नेहमीच सूड घेण्याचे राजकारण आणि लोकांचे लक्ष वळविण्यासाठी प्रयत्न केला आहे. डीके शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयचा छापा हा पोटनिवडणुकीवर परिणाम करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. याचा मी तीव्र निषेध करतो, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -