घरदेश-विदेशCBSE परिक्षांच्या तारखा उद्या जाहिर

CBSE परिक्षांच्या तारखा उद्या जाहिर

Subscribe

उद्या संध्याकाळी ६ वाजता सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय शिक्षण मंत्री यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. परिक्षांच्या तारखा योग्य वेळी समजतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांच्या तारखा उद्या जाहिर करण्यात येणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक सीबीएसई बोर्डाच्या 2021 मधील परीक्षांच्या तारखा उद्या जाहीर करणार आहेत.

उद्या संध्याकाळी ६ वाजता सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय शिक्षण मंत्री यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी शिक्षकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगवर बोलताना सांगितले की, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी केलेल्या सूचना सीबीएसई विचारात घेणार आहे. त्यानुसार 2021च्या बोर्ड परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवरून पाहता येणार आहे. सीबीएसईच्या परिक्षा ठरलेल्या नियोजनानुसार होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक महिने ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहेत. बोर्डाच्या परिक्षाबाबत विद्यार्थी आणि पालकांना हा मोठा प्रश्न आहे. सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांच्या वेळापत्रकांमुळे विद्यार्थांना दिला मिळाला आहे.


हेही वाचा – नवीन कृषी कायदा बैठक : केंद्र सरकारची ‘Lunch Diplomacy’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -