घरताज्या घडामोडीऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

Subscribe

देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर याचा भार आला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी देशातील अनेक राज्यांमधील लसीकरणाचा साठा संपल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे बोले जात आहे. यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील कोणत्याही राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला नाही. राज्याला आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे आता १०० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच यासाठी विशेष सोय देखील करण्यात आली आहे.

ईजी २ गट ठेवतो ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष

मार्च २०२० मध्ये देशात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार आला होता. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने ईजी हा एक गट स्थापन केला होता. हा गट देशातील वैद्यकीय ऑक्सिजनसह उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय उपकरणांचे नियोजन करायचा. त्याप्रमाणे हा गट आता गेल्या एक वर्षापासून कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या सर्व राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा आणि इतर उपकरणाबाबत सहकार्य करत आहे.

- Advertisement -

देशात ७१२७ मॅट्रिक टन उत्पादन होते

देशात दररोज ७ हजार १२७ मॅट्रिक टन उत्पादन केले जाते. तसेच आवश्यकता असल्यास शिल्लक ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजनचे देखील उत्पादन केले जाते. दररोज देशात ७ हजार १२७ मॅट्रिक टन उत्पादन करण्याची क्षमता आहे. त्याप्रमाणे ईजी – २ हा गट याचे नियोजन करतो. तर गेल्या दोन दिवसांपासून १०० टक्के उत्पादन केले जात आहे. यामध्ये सर्वात जास्त वापर हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थानमध्ये करण्यात येत आहे.

५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध

ईजी-२ च्या म्हणण्यानुसार, देशात ५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. तर गेल्या वर्षी १२ एप्रिल २०२० साली देशात ३ हजार ८४२ इतका साठा उपलब्ध होता.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याला पुरेसे remdesivir इंजेक्शन ४ दिवसात मिळणार – राजेश टोपे


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -