घरदेश-विदेशभन्नाट! स्मृती इराणींनी ट्रोलरची केली बोलती बंद!

भन्नाट! स्मृती इराणींनी ट्रोलरची केली बोलती बंद!

Subscribe

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना काही ट्रोलर्सने ट्विटरवर त्यांच्या गोत्रावरून ट्रोल करायला सुरूवात केली होती. मात्र, त्यांना उत्तर देऊन इराणींनी त्यांची बोलती बंद केली आहे.

सध्या देशामध्ये निवडणुकांचा हंगाम असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सची जमात भलतीच सक्रीय झाली आहे! मग त्यामध्ये काही जण सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देत विरोधकांना ट्रोल करत असतात, तर काही जण विरोधकांना पाठिंबा देत सत्ताधाऱ्यांना ट्रोल करत असतात. तसाच काहीसा प्रकार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि भाजपच्या खासदार स्मृती इराणी यांच्या बाबतीत झाला. ट्विटरवर काही ट्रोलर्सनी त्यांना त्यांच्या गोत्रावरून आणि त्या भांगामध्ये लावत असलेल्या सिंदूरवरून प्रश्न विचारला. त्यानंतर अनेक जण त्यांना ट्रोल करू लागले. पण त्यावर स्मृती इराणींनी दिलेलं उत्तर या सगळ्यांची बोलती बंद करणारं ठरलं.

एका वृत्ताने सुरू झाला सगळा प्रकार

या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका न्यूज बेवसाईटने स्मृती इराणींच्या एका ट्विटचा संदर्भ देऊन दिलेल्या वृत्ताने. या वेबसाईटने दावा केल्यानुसार स्मृती इराणींनी असं म्हटलं आहे की त्यांना कोणतंही गोत्र असू शकत नाही, कारण त्यांच्या पतीला आणि मुलाला गोत्र नाही. पण त्यावर स्मृती इराणींनी हा दावा फेटाळून लावत आपल्याला गोत्र असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, स्मृती इराणींच्या ट्विटनंतर सदर वेबसाईटने ते ट्विट काढून टाकलं. मात्र, काही नेटिझन्सनी ते पुन्हा स्क्रीनशॉट काढून पुन्हा ट्विट केलं. मात्र, एवढं सगळं झाल्यानंतर देखील एका ट्रोलरने त्यांना प्रश्न विचारलाच!

- Advertisement -

काय विचारलं ट्रोलरने स्मृती इराणींना?

यासंदर्भात बुधवारी सकाळी एका व्यक्तीने स्मृती इराणींना ट्विट करून विचारलं की, ‘तुमचं, तुमच्या पतीचं आणि तुमच्या मुलाचं गोत्र काय आहे? त्याचबरोबर तुम्ही सिंदूर लावता ते धार्मिक आस्था म्हणून की स्टाईल करण्यासाठी म्हणून?’ या प्रश्नानंतर त्याला पाठिंबा देणाऱ्या अनेकांनी स्मृती इराणी यांच्या गोत्राविषयी शंका घ्यायला सुरुवात केली. त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. अखेर स्मृती इराणींनी या सर्वांना एकाच ट्विटमध्ये उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली.

- Advertisement -

काय म्हणाल्या स्मृती इराणी ट्विटमध्ये?

या सगळ्या प्रकारामुळे वैतागलेल्या स्मृती इराणींनी त्यांच्या ट्विटमध्ये या ट्रोलर्सला ‘मुँहतोड’ स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, ‘सर, माझं गोत्र कौशल आहे. कारण माझ्या वडिलांचं गोत्र ते आहे, त्यांच्या वडिलांचंही तेच होतं आणि त्यांच्या वडिलांचंही तेच होतं. माझे पती झोरोस्ट्रियन (पारसी) आहेत. त्यामुळे त्यांना गोत्र असू शकत नाही. मी कपाळावर सिंदूर लावते, ते स्टाईल म्हणून नसून हिंदू संस्कृतीचं पालन करण्यासाठी म्हणून लावते. आता तुम्ही तुमचं बघा. धन्यवाद!’

‘मेरा धर्म हिंदुस्थान’

या सगळ्या प्रकारानंतर स्मृती इराणी यांनी ट्विटरवर एक पब्लिक डिस्क्लेमरच जारी केलं. यामध्ये त्यांनी सांगितलं की, ‘एक पब्लिक फिगर म्हणून मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. त्यामुळे मी गर्वाने सांगते की माझा धर्म हिंदुस्थान आहे, माझं कर्म हिंदुस्थान आहे, माझी आस्था हिंदुस्थान आहे आणि माझा विश्वास देखील हिंदुस्थान आहे!’

निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे अशा ट्रोलर्सची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नेटिझन्स मतदारांना कोणत्याही ट्रोलिंगला बळी न पडता स्वतंत्रपणे निर्णय घेणं आवश्यक आहे. मग ते ट्रोलिंग कुणाचंही असो, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असो किंवा विरोधकांच्या बाजूने असो!


हेही एकदा वाचाच! – राहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांच्यात ट्विटर युद्ध
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -