Wednesday, June 16, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, रुग्णालयात प्रत्येक बेडनुसार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सक्ती

ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, रुग्णालयात प्रत्येक बेडनुसार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सक्ती

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. यातच अनेक रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णांबरोबर ऑक्सिजन पुरवठा वाढणे आरोग्य यंत्रणेला शक्य न झाल्याने ऑक्सिजन अभावी शेकडोहून अधिक रुग्णांनी जागीच प्रमाण सोडले. यातच कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेता केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील प्रत्येक रुग्णालयातील बेडच्या संख्येनुसार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सक्ती करण्याचा नियम सरकार लागू करेल असा अंदाज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनमध्‍ये उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्‍या स्वयंपूर्ण वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्‍पाचे लोकार्पण सोहळ्याच्या ऑनलाईन उद्घाटनादरम्यान ते बोलत होते.

प्रत्येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा प्रयत्न

यावर बोलताना जावडेकर म्हणाले की, देशात ६५ वर्षे पूर्ण होईनही अद्याप देशात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उत्पादन होत नव्हते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्याप्रमाणात वाढवणे शक्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून धोरणे आखल्याने नवा भारत घडविताना प्रत्‍येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा प्रयत्न सुरु आहे. रुग्‍णालयातील बेडच्‍या संख्‍येनुसार ऑक्सिजन प्रकल्‍पाची सक्‍ती करण्‍याचा नियम सरकार लवकरच करणार आहे, असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

पीएम केअर फंडातूनही ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्यात अनेक अडचणी आढळल्या, यात अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्पच नव्हते त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढवणे मोठे आव्हान होते. तरी ,सरकारने या संकटात १ हजार टन ऑक्सिजन उपलब्ध केले. तसेच आता पीएम केअर फंडातूनही ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार भविष्यात प्रत्येक रुग्णालयांमध्ये बेडच्या संख्येप्रमाणे ऑक्सिजन प्रकल्प उभारणे अनिवार्य करणार आहे. असेही जावडेकर म्हणाले.


सिनेसृष्टी झाली अनलॉक, गोरेगाव फिल्मसिटीमध्ये शूटिंगला दिली परवानगी


 

- Advertisement -