घरमहाराष्ट्रनाशिकम्युकरमायकोसिस रुग्णांसाठी पालिकेचा बाह्यरुग्ण विभाग

म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी पालिकेचा बाह्यरुग्ण विभाग

Subscribe

दवाखान्यांमध्येही तपासणीची व्यवस्था

महापालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिसचे आजवर २२१ रुग्ण आढळून आले असून या रुग्णांसाठी महापालिकेतर्फे बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही तपासणीची व्यवस्था करण्यात आला आहे. याच दवाखान्यांमध्ये कोरोना पश्चात आजारांवरही उपचार होत आहेत.

नाशिक महापालिकाक्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या आता आटोक्यात आली आहे. सद्यस्थितीत कोरोना होऊन गेल्यानंतर काही रुग्णांस त्रास जाणवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंगदुखी व अशक्तपणा याचा समावेश आहे. यासोबत म्युकरमायकोसिसचे रुग्णसुद्धा आढळून येत आहेत. या रुग्णांकरिता पालिकेतर्फे बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या विद्यमान दवाखान्यांमध्ये तपासणीची सोय करण्यात आली आहे. कोरोना उपचारानंतर काही त्रास असल्यास अथवा शंका असल्यास या ठिकाणी नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

- Advertisement -

 

Mucormycosis

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -