घरदेश-विदेशचीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कायद्यात मोठा बदल, थ्री स्टार अधिकाऱ्यालाही होता येणार...

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कायद्यात मोठा बदल, थ्री स्टार अधिकाऱ्यालाही होता येणार सीडीएस

Subscribe

केंद्र सरकारने (सीडीएस) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कायद्यात मोठा बदल केला आहे.त्यामुळे हवाई दलातील थ्री स्टार अधिकाऱ्यालाही सीडीएस होता येणार आहे. केंद्र सरकारने हवाई दलात कार्यरत असणाऱ्या किंवा सेवानिवृत्त एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला संधी देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारकडून वायू सेनेच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. सीडीएस होण्यासाठी एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला वयाची अट टाकण्यात आली आहे. सीडीएस होण्यासाठी 62 पेक्षा अधिक असता कामा नये, असे सरकारच्या गॅझेट अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

सीडीएस कायद्यात बदल –

संरक्षण मंत्रालयाने वायू दर कायदा 1950 च्या सेक्शन 190 अंतर्गत येणाऱ्या एअरफोर्स रेग्युलेशन 1964 मध्ये सोमवारी सुधारणा केली आहे. त्यानंतर याबाबत तातडीने गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार वायू सेनेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला सीडीएस होता येणार आहे. यासाठी त्याचे वय 62 पेक्षा अधिक असू नये असे म्हटले आहे. तर सीडीएसचा कार्यकाळ 65 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो, असेही यात नमूद केले आहे.

- Advertisement -

सीडीएस पद भरण्याबाबत प्रक्रिया सुरु –

देशाचे पहिले सीडीएस जनरल बीपिन रावत यांचा 8 डिसेंबरला एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा पासून सीडीएस हे संरक्षण दलातील महत्वाचे पद रिक्त आहे. केंद्र सरकारकडून हे पद भरण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे वारंवार सांगितले गेले. मात्र, अद्याप सीडीएसची नियुक्ती झालेली नाही.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -