घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटअमेरिकेने हात झटकल्यानंतर चीनची WHO ला ३ कोटी डॉलर्सची मदत

अमेरिकेने हात झटकल्यानंतर चीनची WHO ला ३ कोटी डॉलर्सची मदत

Subscribe

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी गोठवू, अशी धमकी दिल्यानंतर आज चीनने WHO ला भरघोस मदत जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी चीनने WHO ला ३ कोटी डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. आजवर अमेरिका हा जागतिक आरोग्य संघटनेला मदत करणारा सर्वात मोठा देश मानला जात होता. मात्र कोरोनाच्या संकटाशी आरोग्य संघटनेला व्यवस्थित सामना करता आला नसल्याचा आरोप अमेरिकेने करत मदत थांबविण्याची घोषणा केली होती.

चीनचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गेंग शाँग यांनी सांगितले की, आज आम्ही देत असलेली मदत ही पुर्वी दिलेल्या मदतीपासून वेगळी आणि नवीन आहे. याआधी चीनने WHO ला २ कोटी डॉलर्स दिले होते. या निधीमुळे विकसनशील देशांना अधिक चांगल्या पद्धतीने मदत करता येईल, असा विश्वास गेंग शाँग यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मदतीच्या माध्यमातून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेवर असलेला विश्वास दाखवत आहोत, असेही शाँग यांनी सांगितले.

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेचा निधी गोठविण्यात येईल, असा इशारा दिला होता. संघटना चीनला पाठिशी घालत असून चीनमधून हा व्हायरस जगभर पसरला यामागील गांभीर्य लपवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तसेच अमेरिकेच्या भरीव मदतीनंतर देखील WHO ही चीन धार्जिनी असल्याचेही ट्रम्प म्हणाले होते.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे करदाते लोक दरवर्षी WHO ला ४०० ते ५०० मिलियन डॉलर्सची मदत देते. तर चीन हे प्रतिवर्षी ४० मिलियन डॉलर्स किंवा त्याहून कमी मदत जाहीर करते. तरिही चीनमध्ये अतिशय कमी मृत्यूदर ठेवण्यात WHO ने त्यांना मदत केली आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात १ लाख ८१ हजार मृत्यू झाले आहेत. चीनच्या वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरला होता. आज जगभरातील १९३ देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून हे देश आर्थिक संकटाशी सामना करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -