घरदेश-विदेशमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जिवंत जाळले

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जिवंत जाळले

Subscribe

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला अज्ञात इसमांनी जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला असून अलमोरा रानिखेत परिसरात ही घटना घडली आहे. या मुलाच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्यात आले आहे. दिनेश सिंग बिष्ट (१५) असे या मुलाचे नाव आहे. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर २०० मीटर अंतरावरच हा प्रकार घडला. मयत मुलगा याच परिसरातील एका खाजगी शाळेत शिकत होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात तक्रार नोंदवली असून तपास सुरु केला. या घटनेनंतर मुलाचे कुटुंबीयांमध्ये एकच शोककळा पसरली आहे. मुलाचे पालक अद्यापही धक्क्यात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या प्रकरणी रानीखेत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. या प्रकरणी अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी नारायण सिंग यांनी सांगितले की,”प्रत्यक्षदर्शी नसल्याने दिनेशला कोणी जाळले हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी आमची चौकशी सुरु आहे. दिनेशचे मित्र आणि कुटुंबीयांचे जवाब नोंदवण्यात आले आहे. त्याचे वडिलांचे याच परिसरात दुकान आहे. सूड घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.”

- Advertisement -

कसा घडला प्रकार
मॉर्निंग वॉकसाठी गेल्यावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर रॉकेल फेकले. पहाटेची वेळ असल्यामुळे रत्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे दिनेशच्या मदतीला कोणी आले नाही. दिनेशला जाळल्यावर त्याने आरडाओरड केल्याने जवळ असलेल्या लोकांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत दिनेशचे शरीर पूर्ण जळून गेले होते. या घटनेबद्दल स्थानिकांनी दिनेशच्या घरांच्या कळवले. दिनेशला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

या जिल्ह्यात घडलेला हा दुसरा प्रकार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात दहावीच्या एका विद्यार्थ्याला शाळेच्याच परिसरात जाळल्याची घटना घडली होती. या घटनेतही अज्ञात इसमांनी या मुलाला जिवंत जाळले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -