घरताज्या घडामोडीविधानसभा निवडणूकीत काँग्रेसला अपयश, पक्षात मोठे बदल करण्याची गरज - कपिल सिब्बल

विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला अपयश, पक्षात मोठे बदल करण्याची गरज – कपिल सिब्बल

Subscribe

कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता अधिक बोलणार नाही. परंतु योग्य वेळी चर्चा करण्यात येईल विचार मांडण्यात येतील.

देशातील चार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. यानंतर आता पराभूत झालेल्या राजकीय पक्षांनी आत्मपरिक्षण करण्यास सुरुवात केली आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया देत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. सिब्बल यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकता आली नाही तसचे असाम आणि केरळमध्ये काँग्रेस फोल ठरल्यामुळे पक्षाच्या या खराब प्रदर्शनावर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कपिल सिब्बल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या खराब कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांनी म्हटलंय की, काँग्रेस विधानसभा निवडणूकीमध्ये चांगली कामगिरी करु शकली नाही. आसाम केरळमध्येही काँग्रेसला अपयश आले आहे. बंगालच्या निवडणूकीत एकही जागा मिळवू शकलो नाही. आता पक्षात अंतर्गत चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

दरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता अधिक बोलणार नाही. परंतु योग्य वेळी चर्चा करण्यात येईल विचार मांडण्यात येतील. सध्या कोरोना परिस्थितीविरोधात लढा देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हाले की, मोदींनी देशाला सांगितले पाहिजे की, कोरोनाची लढाई आपण एकत्र जिंकू निवडणुका वेगळी बाब आहे परंतु ही जन्म आणि मृत्यूची लढाई आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी झांसी ची राणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना विचारण्यात आले की ममता बॅनर्जी यांना झांसी ची राणी का म्हटले जात आहे? यावर त्यांनी म्हटलंय की, जेव्हा मोदींनी २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा त्यांचेही आम्ही अभिनंदन केले होते. परंतु त्यांना झांसी ची राणी म्हणू शकत नव्हतो. आपल्याला जिंकणाऱ्या नेत्यांचे अभिनंदन केले पाहिजे. बंगालमध्ये केंद्र सरकारने जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांना निवडणूक आयोगाने मदतही केली आहे. तरिही ममता बॅनर्जी अधिक मतांनी विजयी झाल्या त्यामुळे त्यांना झांसी ची राणी म्हटले पाहिजे असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -