घरमुंबईCovid Pandemic: कोरोनातही नायरमध्ये १००१ पॉझिटीव्ह मातांची यशस्वी प्रसुती; आदित्य ठाकरेंनी केले...

Covid Pandemic: कोरोनातही नायरमध्ये १००१ पॉझिटीव्ह मातांची यशस्वी प्रसुती; आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

Subscribe

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनामुळे मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक आहे. दरम्यान, या काळात कोरोनाच्या विळख्यात कित्येक गरोदर माता देखील सापडल्या. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयाने या कोरोनाच्या संकटात आतापर्यंत १००१ कोरोनाबाधित मातांची सुखरूप यशस्वी प्रसुती केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीवायएल नायर रुग्णालयाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र, नवजात आणि बालरोगशास्त्र आणि अॅनेस्थेसिओलॉजी या विभागांच्या यासाठी खूप परिश्रम केले, असे बीएमसीने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, नायर रुग्णालयाच्या यशस्वी कामगिरीचं राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक करण्यात आले. यावेळी त्यांनी एक ट्वीट देखील केले. यामध्ये त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्यासह कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालय हे एप्रिल २०२० मध्ये कोविड-१९ म्हणून घोषित करण्यात आले होते. गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेची प्रसुती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत एक हजार कोरोनाबाधित मातांनी १०२२ बालकांना जन्म दिला आहे. यामध्ये तिळे आणि १९ जुळ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तर मागील एक वर्षात रुग्णालयात झालेल्या १००१ प्रसुतींपैकी ५९९ बालकांचा जन्म सामान्य प्रसुतीद्वारे झाला तर ४०२ जणांचा सिझेरियन पद्धतीने झाला.

- Advertisement -

बीएमसीने त्यांच्या पत्रकात असे म्हटले की, आई कोरोनाबाधित असेल तर जन्माना आलेल्या बाळाची कोविड-19 चाचणी करणं बंधनकारक आहे. मागील एक वर्षात अनेक बालकं कोरोनाबाधित आढळली, परंतु त्यांच्या कोणतीही लक्षणे नव्हती. या बालकांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -