घरदेश-विदेशपी. चिदंबरम प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल

पी. चिदंबरम प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल

Subscribe

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आज, सोमवारी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज दिवसभरात दोनदा त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना उपचाराकरता एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही वेळानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनलचा त्रास होत असल्याचे सांगितले गेले. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत.

- Advertisement -

चिदंबरम यांना सहा दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सीबीआयने म्हटले की, चिदंबरम यांच्याविरोधात दोन साक्षीदारांनी आपला जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा जामीन रद्द व्हायला हवा. कारण, ते जामीनावर बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकतात.

- Advertisement -

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -