घरट्रेंडिंगराहुल गांधींचा 'दीड मिनिटांचा' खेळ सारा..

राहुल गांधींचा ‘दीड मिनिटांचा’ खेळ सारा..

Subscribe

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींची ही पत्रकार परिषद सध्या चर्चेचा ठरतोय. त्याला कारणही तसंच मजेशीर आहे. सभेदरम्यान राहुल गांधी यांनी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी भाषणाला सुरुवात केली, मात्र ९ वाजून २२ मिनिटांपूर्वीच त्यांनी आपले भाषण आवरते घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचं लक्ष राहुल गांधीच्या मुंबईतील या पत्रकार परिषदेकडे लागून राहिले होते. मात्र, जवळपास ५० मिनिटं प्रतिक्षा केल्यानंतर पत्रकारांच्या पदरी निराशाच आली.

छोट्या भाषणाताले ‘बडे’ मुद्दे

अवघ्या दीड मिनिटांच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. वाचा राहुल गांधींनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –

- Advertisement -

केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून भारताचे संविधान आणि भारताच्या सर्व संस्थांवर आक्रमण करण्यात येत आहे.

- Advertisement -

भाजप सरकार केवळ श्रीमंत लोकांचीच कर्ज माफ करत आहेत.

मनमोहन सिंहांच्या कारकिर्दीत पेट्रोलचे दर १४० डॉलर प्रति बॅरल होते. मात्र, आज तेच दर ७० डॉलर प्रति बॅरल आहेत. पण त्याता सामान्य जनतेला त्याचा फायदा होत नाही.

पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणावं अशी आमची मागणी आहे. मात्र, मोदींना  त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही.

मोदी सरकारच्या राजकीय कारभारामुळे सध्या सर्व देश नाराज आहे. त्यांच्यासाठी आमची लढाई सुरु आहे.

व्हिडिओ सौजन्य – झी २४ तास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -