घरदेश-विदेशमिझोराममध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती

मिझोराममध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती

Subscribe

मिझोरामच्या ऐजल आणि लुंगले जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मिझोराम सरकारने दोन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली आहे. या दोन जिल्ह्यातील १००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसामुळे नदी पातळीत वाढ
लुंगले जिल्ह्यातील खवथलांगटुईपुई नदीजवळ राहणाऱ्या २५० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १८० घरे वाहून गेली आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होत चालली आहे. जोरदार पावसामुळे टिपराबागमधील १०० तर सेरहुआं गावातील ७० घरं वाहून गेली असून तलबुंग शहरामध्ये ३० घरं पाण्याखाली गेली आहेत.

- Advertisement -

भाताची लागवड पाण्याखाली
लुंगले जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड पाण्याखाली केली असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तवांग नदीच्या पुराच्या पाण्यामुळे आयझल येथील ३० किमी लांब असलेल्या सयंग गावात सुमारे १० घरे पाण्याखाली गेली होती. तेथील सुमारे ३० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. भू-स्खलन तसेच चिखलामुळे लुंगले जिल्ह्यातील आयझल आणि इतर ठिकाणी पोहोचण्या व्यतिरिक्त राज्यातील अनेक रस्ते रोखण्यात आले आहेत. पूर परिस्थितीमुळे आयझल येथून लेगपुई विमानतळाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीचीच पुनरावृत्ती
गेल्या वर्षीही याच काळात मिझोरामला पावसाने झोडपले होते. लुंगले जिल्ह्यातील तलाबुंग परिसरात अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू झाला होता तर ६ नागरिक बेपत्ता झाले होते. त्यामुळे याही वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिझोराममध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -