घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक बनले राजकीय नेत्यांसाठी 'राजकारणा'चं ठिकाण; राऊत नाशिकच्या दौऱ्यावर

नाशिक बनले राजकीय नेत्यांसाठी ‘राजकारणा’चं ठिकाण; राऊत नाशिकच्या दौऱ्यावर

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये राजकीय नेत्यांची ये-जा वाढल्याने हा जिल्हा राजकारण्यांसाठी राजकीय केंद्रबिंदू बनत चालला आहे का? असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये राजकारणातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.

नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनमाडला जाऊन आले. त्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत नाशिकला जाणार आहेत. महिन्याभराआधीच संजय राऊत हे नाशिकला गेलेले होते. त्यामुळे नेमके आता पुन्हा संजय राऊत नाशिकला जाऊन नेमके काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण नाशिकमध्ये हल्ली राजकीय नेत्यांची वाढलेली मांदियाळी पाहून अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये राजकीय पक्षाच्या बैठकांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

महिन्याभराआधीच संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये येऊन संजय राऊत नेमके काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच मागील आठवड्यात शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा नाशिकमधील काही तालुक्यांना भेट दिली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसात अनेक जून्या शिवसैनिकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे आणि हे तेव्हाच घडते जेव्हा ठाकरे गटामधील एखादा नेता हा नाशिकमध्ये जातो. त्यामुळे अनेकांकडून ठाकरे गटावर टीका देखील करण्यात येत आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा नाशिक जिल्ह्याला भेट दिली होती. तर त्याचदरम्यान, भाजकडून देखील नाशिकमध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली होती. यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाडचा दौरा केला होता. त्यानंतर लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाड येथे भेट दिली.

हेही वाचा – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, सातवा वेतन आयोग फेब्रुवारीपासून लागू

- Advertisement -

दरम्यान, मंत्र्यांच्या या गाठीभेटींमुळे मात्र अधिकाऱ्यांमध्ये तारांबळ उडाली आहे. सततच्या राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे अधिकारी वर्ग मात्र चांगलाच वैतागलेला दिसत आहे. तर राजकीय नेत्यांच्या या भेटीमुळे नाशिक हे राजकीय नेत्यांच्या खलबते करण्याचे प्रमुख ठिकाण बनले आहे का? अशी शक्यता आता निर्माण होऊ लागली आहे. तर संजय राऊत येऊन गेल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी किती पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पण गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांची नाशिकमध्ये ये-जा वाढल्याने मुंबई प्रमाणेच नाशिक सुद्धा राजकारणाचे केंद्रबिंदू बनल्याचे दिसू लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -