घरदेश-विदेशCorona Cases in School : शाळा सुरु होताच 'या' राज्यांत कोरोनाचा विस्फोट!...

Corona Cases in School : शाळा सुरु होताच ‘या’ राज्यांत कोरोनाचा विस्फोट! १०० विद्यार्थी पॉझिटिव्ह

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ऑक्टोबरपासून   महाराष्ट्रासह अनेक राज्यांत शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या. तर अनेक राज्यांत ऑनलाईन शाळा सुरु आहेत. मात्र महामारीदरम्यान शाळा सुरु झाल्याने गेल्याकाही दिवसात शाळकरी मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आलेय. ओडिशा, राजस्थानसारख्या अनेक राज्यांतील शाळांमधील काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झालेय. अनेक राज्यांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊन विविध राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची आकडेवारी…

जयपूरमध्ये ११ शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

राजस्थानच्या जयपूरपमधील जयश्री पेंडीवाल शाळेतील ११ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकाच शाळेतील ११ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त होतेय. दरम्यान शाळा प्रशासनाने तात्काळ शाळा बंद केली असून पुढील उपाययोजनांवर काम सुरु आहे.

- Advertisement -

तेलंगणामध्ये २८ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत रविवारी २८ विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांनी माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे इतर मुलांना घरी सोडण्याची मागणी केली. दरम्यान आता आरोग्य विभागाने सर्व विद्यार्थ्यांना आणि शालेय कर्मचाऱ्यांना सामूहिक कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. या शाळेत ५७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी. हरीश राव यांनी जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना संपर्क करत पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती घेतली आहे.

ओडिशामधील ७० हून अधिक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील सरकारी अनुदान प्राप्त शाळेतील ५३ विद्यार्थीनींना आणि बुर्लातील वीर सुरेंद्र साई इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज अँड रिसर्च (VIMSAR) सेंटरमधील २२ एमीबीबीएस विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या उपचारांवर विशेष लक्ष दिले जातेय. परंतु या विद्यार्थ्यांची स्थिती सामान्य आहे. दरम्यान या शैक्षणिक संस्थांनी आठवडाभर शाळा बंद ठेवल्या आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -