घरदेश-विदेशव्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिनेनं दिला बाळाला जन्म, आई आणि बाळ क्वारंटाइन

व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिनेनं दिला बाळाला जन्म, आई आणि बाळ क्वारंटाइन

Subscribe

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. या विषाणूची दुसरी लाट अगदी मोठ्यांपासून नवजात बाळांवरही गंभीर परिणाम करत आहे. त्यामुळे देशात रुग्णसंख्या सतत वाढतेयं परिणामी मृतांचा आकडेवारीतही मोठी वाढ होतेय. याचा सर्वाधिक परिणाम गरोदर महिलांना सहन करावा लागत आहे. कारण गरोदरपणामुळे आधीच प्रतिकारशक्ती किंवा शरीरातील ताकद कमी असल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्यास बाळ आणि आई अशा दोघांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे गरोदर महिलांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्यती खबरदारी घ्यावी लागत आहे. अशातच एका गरोदर कोरोनाबाधित महिलेने व्हेंटिलेटरवर असतानाही गोंडस बाळाला जन्म दिल्याची सुखद घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरत या ठिकाणच्या एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. दरम्यान गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या आईवर उपचार सुरु आहेत तर बाळाला क्वारंटाइन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या गरोदर कोरोनाबाधित महिलेवर सूरतमधील रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. याचदरम्यान तिला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. यावेळी डॉक्टरांमसमोर महिलेसह बाळाचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान होते. परंतु संबंधित महिलेने व्हेंटिलेटर असतानाही एका गोंडस बाळाला सुखरुप जन्म दिला आहे. यामुळे डॉक्टरांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

- Advertisement -

दरम्यान या बाळाच्या जन्मानंतर त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर आई आणि बाळ वाचल्याने नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला. सध्या या आईवर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु असून बाळाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या गंभीर परिणामांशी सामना करणाऱ्या रुग्णांचा जीव जात असल्याचा घटना घडत असताना व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिलेने बाळाला सुखरुप जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.


Corona Update : WHO मार्फत भारतात मनुष्यबळ, साधनसामग्री पाठवण्याचा निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -