घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी

Live Update: मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी

Subscribe

मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी, नागरिकांची उडाली तारांबळ


टीएमसी युवा काँग्रेस प्रमुख सायोनी घोषला अगरतला पोलिसांनी केलं अटक

- Advertisement -

भाजप कार्यकर्त्यांवर धावून गेल्यामुळे घोष यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी प्राथमिक पुराव्यांच्या आधारे ही अटक केली आहे.

- Advertisement -

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतला निर्णय

ईशान किशन आणि युजवेंद्र चहलची वापसी


राजेंद्र गुड्डा आणि जाहिदा खान यांनीही राजस्थान सरकारच्या राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


राजस्थानमधील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हेमाराम चौधरी यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.


विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. तर ऋतुराज सिन्हा आणि आशा लाक्रा यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


आज विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा केला. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामधील फडवणीस काय म्हणाले?

अमरावतील मधील घटनाक्रम दुर्दैवी

चुकीच्या माहितीच्या आधारे मोर्चे कोणी प्लॅन केले?, याची सखोल चौकशी करा.

अमरावतीतील मोर्चाला कोणी परवानगी दिली? याचीही चौकशी व्हायला हवी.

त्रिपुरातील कथित घटनेवर जाणीवपूर्वक हिंसाचार

घटनेशी संबंध नसलेल्या लोकांवर केले गुन्हे दाखल

 


पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना जयपूर येथे भेटले.


देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्याला सुरुवात. चंद्रशेखर बावनकुळे देखील फडणवीसांसोबत उपस्थितीत आहेत.


सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा. शिंदे आणि रांणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.


देशात गेल्या २४ तासांत १० हजार ४८८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३१३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १२ हजार ३२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४५ लाख १० हजार ४१३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ६५ हजार ६६२ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३९ लाख २२ हजार ३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख २२ हजार ७१४ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच देशात आतापर्यंत ११५ कोटी ५० लाख ५५ हजार २१० लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे.


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारासंदर्भात फडवणीस आढावा घेणार असून दुपारी १२.३० वाजता फडणवीसांची पत्रकार परिषद असणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्यासठी आज सकाळी ११ वाजता संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. यामध्ये मृत शेतकरी कुटुंबियांच्या मदतीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच एमएसपी कायद्यासह प्रलंबित मागण्यावर चर्चा होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -