घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकदाचित कोरोनाची लस कधी सापडणारच नाही; संशोधन प्रमुखाचं धक्कादायक वक्तव्य!

कदाचित कोरोनाची लस कधी सापडणारच नाही; संशोधन प्रमुखाचं धक्कादायक वक्तव्य!

Subscribe

जगभरात आजपर्यंत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारो रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. अजूनही मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक देश लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. मोठमोठ्या अर्थव्यवस्था गुडघ्यांवर आल्या आहेत. भविष्यकाळ चिंतेत टाकणारा दिसत असतानाच या चिंतेत मोठी भर घालणारं एक गंभीर विधान कोरोनाची लस शोधणाऱ्या पथकाच्या प्रमुख संशोधक जेन हाल्टन यांनी केलं आहे. ‘एचआयव्हीने दर वर्षी साधारणपणे ८ लाख लोकं मरत आहेत. तेही गेल्या ४० वर्षांपासून अजूनपर्यंत एचआयव्हीवर कोणतीही लस सापडलेली नाही. कदाचित कोरोनाची देखील लस कधीच मिळणार नाही’, असं वक्तव्य हाल्टन यांनी केलं आहे. आजतकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

प्लॅन बी तयार ठेवा…!

कोरोनावर इलाज ठरू शकेल, अशी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करणारं एक आंतरराष्ट्रीय पथक सध्या काम करत आहे. या पथकाच्या प्रमुख जेन हाल्टन यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. त्यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वात अनुभवी साथरोग तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं. हाल्टन म्हणतात, ‘अवघं जग सध्या कोरोनावर उपाय ठरेल अशा लसीची प्रतिक्षा करत आहे. पण कदाचित एचआयव्हीप्रमाणेच कोरोनाची देखील लस कधीच सापडू शकणार नाही. त्यामुळे फक्त लसीवरच अवलंबून न राहाता जगाने प्लॅन बी सुद्धा तयार ठेवावा’.

- Advertisement -

कोरोना लसीचे दावे अविश्वसनीय…!

जगभरात विविध ठिकाणी सध्या कोरोनाच्या लसीचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडून २०२१पर्यंत कोरोनाची लस सापडण्याचे दावे देखील केले जात आहेत. पण हाल्टन म्हणतात, ‘मी जगाला सतर्क करत आहे. फक्त लसीच्या भरवशावर न राहाता प्लॅन बीची देखील तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण इतक्या कमी वेळात कोरोनावरची लस सापडणं हे अविश्वसनीय आहे. हे दावे मला अवास्तव वाटतात. COVID-19 व्यतिरिक्त देखील कोरोनाच्या इतर प्रजातींवर अजूनही लसी सापडलेल्या नाहीत’.

दरम्यान, कोरोनाच्या लसीसाठी आतुरतेनं वाट पाहाणाऱ्या जगासाठी हाल्टन यांचं हे वक्तव्य निराशाजनक जरी वाटत असलं, तरी त्यांनी वेळीच सगळ्यांना सतर्क करून वेगळ्या उपायांचा शोध घेण्याचं केलेलं आवाहन नक्कीच जगभरातल्या सरकारांसाठी महत्त्वांचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -