घरताज्या घडामोडीHope Mars Mission: 'या' मुस्लीम देशाने पहिलं यान मंगळावर पाठवलं!

Hope Mars Mission: ‘या’ मुस्लीम देशाने पहिलं यान मंगळावर पाठवलं!

Subscribe

सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं.

जपानच्या मदतीने युएईने होप मार्स मिशन चे जपानच्या तानेगाशिमामध्ये लाँच पॅडवरून यशस्वी प्रक्षेपण केलं. त्यामुळे आता मंगळावर यान योजणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे. युएईच्या अंतराळ संशोधन संस्थेनेच हे प्रक्षेपण यशस्वी ठरल्याची माहिती दिल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

- Advertisement -

सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल. त्यानंतर २०२१ मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे.

होप मिशनच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत पहिल्यांदाच हा उपग्रह पाठवण्यात आला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अस्तित्व कसं संपुष्टात आलं यासंदर्भातील महत्वाची माहिती मिळणार आहे. मंगळावरील हवा, पाण्याचा अंश आणि मातीचाही या उपग्रहामार्फत अभ्यास केला जाणार आहे. मंगळ ग्रहासंदर्भातील बरीच नवीन माहिती या उपग्रहाच्या मदतीने मिळणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Corona Update : एका रात्रीत औरंगाबादमध्ये नव्या ३६ रूग्णांची नोंद!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -