घरदेश-विदेशवुहानमध्ये १ वर्षानंतर पुन्हा कोरोनाची एन्ट्री; संपूर्ण शहरात चीन करणार Covid-19 टेस्ट

वुहानमध्ये १ वर्षानंतर पुन्हा कोरोनाची एन्ट्री; संपूर्ण शहरात चीन करणार Covid-19 टेस्ट

Subscribe

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा देशभऱात कहर सुरू आहे. कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान शहरातून पसरला असून कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून वुहानला संबोधले जाते. मात्र याच वुहानमध्ये पुन्हा कोरोना बाधित रूग्ण आढळ्याचे सांगितले जात आहे. एका वर्षानंतर वुहानमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाल्याने संपूर्ण शहरात चीन करणार Covid-19 टेस्ट करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. चीनच्या वुहान शहरात एका वर्षानंतर कोरोना परत आला असून ज्या शहरातून जगातील कोरोनाचे पहिल्यांदा रूग्ण नोंदवली गेली होती. कोरोना पुन्हा आल्याने घाबरलेल्या चीनने संपूर्ण शहराची मास कोविड चाचणी घेण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वुहान शहराची लोकसंख्या ११ कोटी आहे. वुहान प्रशासनाचे अधिकारी ली ताओ यांनी मंगळवारी असे सांगितले, कोरोना व्हायरसच्या प्रसाराची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी सर्व नागरिकांची न्यूक्लिक अॅसिड चाचणी केली जाणार आहे.

आरोग्य यंत्रणेवरचे संकट वाढणार

वुहानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांमध्ये कोरोना विषाणूची सात जणांना लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वुहानच्या आरोग्य यंत्रणेवरचे संकट वाढणार आहे. कारण चीनने अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण केल्याचा दावा केला आहे. कोरोनाचे पहिले केंद्र असलेल्या वुहानमध्ये व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने अत्यंत कडक लॉकडाऊन लागू केला होता, ज्याचे चांगले परिणामही दिसून आले होते. वुहान प्रशासनाने संपूर्ण शहराला घरातच बंदिस्त केले होते. यामुळे वुहानमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली होती.

- Advertisement -

कोरोनासह डेल्टा व्हेरिएंटचाही धोका

इतकेच नाही तर गेल्यावर्षी वुहानमध्ये कोरोनाने कहर केला असताना कोरोना विषाणूची तपासणी आणि संसर्ग प्रतिबंधक मोहीम अनेक महिने चालू होती. मंगळवारी चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले ६१ नवे रुग्ण आढळली आहेत. यासोबतच कोरोनाचा अतिशय वेगाने पसरणारा डेल्टा व्हेरिएंटही अनेक शहरांमध्ये पोहोचला आहे. चीनच्या नानजिंग प्रांतात या व्हेरिएंटच्या संसर्गाची रूग्णे वेगाने आढळून येत आहेत. त्यामळे संपूर्ण देशात हा व्हेरिएंट पून्हा थैमान घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Earthquake: अंदमान-निकोबारमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; सौम्य धक्क्याने हादरली जमीन

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -