घरताज्या घडामोडीकोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे निधन

कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे निधन

Subscribe

कोकण मतदारसंघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले माजी आमदार रामनाथ मोते सर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मोते हे शिक्षक मतदार संघातून दोन वेळा निवडून आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज सकाळी मुलुंड मधील फोरटीज रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामनाथ मोते यांचे कार्य प्रचंड होते. त्यांनी शिक्षण व शिक्षकांसाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. केवळ विधान परिषदेत आवाज उठवणे इतकेच नव्हे तर रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण करणं हे त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकवेळा केलं. शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत ते लढत राहीले.

- Advertisement -

त्यानंतर १२ वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी एक आदर्श अभ्यासू व तळमळीचा लोकप्रतिनीधी म्हणून कार्य केले. विधान परिषदेतील त्यांच्या कार्याचा अहवाल ते मी आमदार रामनाथ मोते बोलतोय या पुस्तकातून देत असत. मोतेसर आता शिक्षक आमदार नसले तरी त्यांची शिक्षकांसाठी सतत धडपड सुरू असायची.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -