घरCORONA UPDATECoronavirus Live Update: मुंबईतील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण आकडा ४!

Coronavirus Live Update: मुंबईतील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण आकडा ४!

Subscribe

मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिसाचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्यांचा कोरोनासाठीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी ही बाब उघडकीस आली. कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या या सहायक फौजदाराच्या मृत्यूमुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या मुंबई पोलिसांची संख्या ४ झाली आहे. त्यांना मधुमेहाच्या त्रासामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, तिचा अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

police death

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान कोरोनाचीबाधा झाल्याच्या भीतीने हतबल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (सविस्तर वाचा)


कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये शुक्रवारी तब्बल ९० नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी ४६८ वर गेली होती. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा ५०८ वर गेला आहे. शनिवारी सकाळी १८, दुपारी ३ आणि सायंकाळी १० असे एकूण ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना गावी जायचे आहे. अशा नागरिकांकरता आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून एसटीतून त्यांच्या गावाला मोफत जाता येणार आहे. मात्र, एका बसमधून केवळ २२ लोकांनाच त्यांच्या गावाला सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. येत्या १७ मेपर्यंतच ही सुविधा राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित पूर्णता बिघडले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चक्क शासनाने दिलेल्या सवलतीचा पैशांवर एसटी महामंडळाला आता अवलंनबून राहावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप बँकेकडून सभासदांना देण्यात येणाऱ्या रुपया निधी वर्गणीवरील व्याज मिळण्याची आशा होती. मात्र बँकेकडून फतवा काढत रुपया निधी वर्गणीवरील व्याज वाटपवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे दुष्काळात तेरा महिना सारखी परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच अनेक राज्य सरकारची चिंता वाढली असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. पुण्यात करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली किंवा मृत्यूदर जास्त असला तरी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. आधी ५ दिवस, मग ८ दिवस, नंतर ११ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. मात्र, आता १३ दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत आहे, ही बाब दिलासादायक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा)


सायन रुग्णालयातील अधिष्ठातांना हटवून त्यांच्या जागी डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती सायन रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात या हॉस्पिटलचे डीन चौथ्यांना बदलण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत ठेवले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा विषय विरोधकांनीही चांगलाच लावून धरला होता. त्यामुळे अडचणीत आलेल्या रुग्णालय प्रशासनाने आता नव्या अधिष्ठांताची नियुक्ती येथे केली आहे.


राज्यातील ७१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ६४८ हे अॅक्टीव्ह केसेस आहेत. या पोलीस रुग्णांपैकी ६१ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५ पोलिसांचा या विषाणूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ले होण्याच्या १९४ घटना घडल्या असून त्यातील ६८९ प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजारांच्या वर गेली असली तरी आतापर्यंत २०० हून अधिक जिल्हे हे कोरोनामुक्त असल्याची समाधानकारक बाब आहे. तर काही असेही जिल्हे आहेत ज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील जवळपास ७५ जिल्ह्यांत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत असून ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (ICMR) आता या ७५ जिल्ह्यांचा अभ्यास सुरू करण्याची योजना बनवली आहे.


नालासोपारा येथून रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील विविध गावात पायी जाणाऱ्या ५० जणांना वाशी टोल नाका येथे नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता अडवले. त्यात बहुतांश लहान मुले आणि महिला आहेत.

रोहा तालुक्यात गावी पायी जाण्यासाठी निघाले
रोहा तालुक्यात गावी पायी जाण्यासाठी निघाले

यंदाच्या वर्षाच कोणत्याही शाळेने फी वाढ करू नये, असा जीआर राज्य सरकारने काढला आहे. तसेच सर्व पालकांनी पाल्यांच्या संबंधीत शाळेत याबाबतची माहिती देण्याची विनंतीही सरकारने जारी केलेल्यी पत्रकात करण्यात आली आहे. शाळा तुमच्याकडून आगाऊ फी घेण्यासाठीही सक्ती करू शकणार नाही, हे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

फी वाढ न करण्याचे सरकारचे आदेश

औरंगाबादमध्ये कोरोनाची स्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी रात्री कोरोनाचे १७ रुग्ण वाढले असून यामध्ये संजयनगर ६, बाबर कॉलनी ४, कटकट गेट २, भवानीनगर २, रामनगर सिल्कमिल आणि असेंफियाबमधील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. तर १७ रुग्णांमध्ये १० महिला आणि सात पुरुष आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर पोहोचली आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला असून २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


मुंबईत शुक्रवारी ७४८ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ९६७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४६२ वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी ७४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ११९६७ वर पोहचली आहे. ४ ते ६ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या २०६ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४६२ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २५ जणांमध्ये १३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १३ पुरुष तर १२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १३ जण हे ६० वर्षांवरील, तर ९ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तिघांचे वय ४० वर्षांखालील होते. मुंबईत कोरोनाचे ४६२ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १३ हजार ७४९ वर पोहचली आहे. तसेच १५४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २५८९ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.


राज्यातील सलग तिसऱ्या दिवशी हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शुक्रवारी तब्बल १ हजार ०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये मुंबईत सर्वाधिक ७४८ रुग्ण सापडले. शुक्रवारी राज्यात सापडलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. तर ३७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईमधील २५, पुण्यातील १०, जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


देशात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ३४२ झाली असून आतापर्यंत १ हजार ८८६ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. देशात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ३४२ झाली असून आतापर्यंत १ हजार ८८६ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून रुण बरे होण्याचे प्रमाण २९.३३ टक्के इतके झाले आहे. देशातील २१६ जिल्हे कोरोनामुक्त झाले असून ५२ जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर २७ जिल्ह्यांमध्ये २१ दिवस तर, ३७ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांमध्ये, ६९ जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -